Join us  

न्यू इअर पार्टीमध्ये दिसायचंय सुंदर-सुडौल? मग आजपासूनच फॉलो करा ४ वेट लॉस रुल्स, काही दिवसात दिसेल फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2023 10:24 AM

How to lose weight before New Year's Eve : व्यायाम-डाएटसाठी वेळ मिळत नसेल तर, लाईफस्टाईलमध्ये करा ४ सोपे बदल, फॅट्स होतील झरझर कमी..

बघता-बघता दिवाळी (Diwali) सरली, आता काही दिवसात नाताळ येईल. नाताळ (Christmas) झाल्यानंतर वर्षही संपेल. मग वर्षाच्या पहिल्या तारखेला सगळे जिममध्ये गर्दी करतील. प्रत्येक जण वजन कमी करण्यासाठी वर्षाच्या पहिल्या तारखेची वाट बघतात. तर काही जण वर्षाअखेरीस, म्हणजे न्यू इअर पार्टीमध्ये सुंदर-सुडौल दिसण्यासाठी नोव्हेंबर (November) महिन्यापासून सुरुवात करतात. पण जर आपल्याला न्यू इअर पार्टीमध्ये सुंदर-सुडौल दिसायचं असेल तर, आतापासूनच तयारीला लागा.

कारण वजन (Weight Loss) एका दिवसात कमी होत नाही, किंवा एका दिवसात वाढतही नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी वेळ हा लागतोच. पण नवीन वर्षाआधी स्वतःला फिट करायचं असेल तर, पोषणतज्ज्ञ मनप्रीत यांनी सांगितलेल्या ४ टिप्स फॉलो करून पाहा. लाईफस्टाईलमध्ये हे ४  बदल केल्याने आपल्याला नक्कीच काही दिवसात फरक दिसेल(How to lose weight before New Year's Eve).

प्रोटीन-रिच फूड खा

वजन कमी करण्यासाठी सकस आहाराचे सेवन करायला हवे. आपल्या आहारात कार्ब्स, फायबर, हेल्दी फॅट्स व प्रोटीनचा समावेश असावा. प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय उलट सुलट खाण्याची इच्छाही होत नाही. त्यामुळे प्रथिनांचा आहारात नक्कीच समावेश करा.

डॉक्टर नेने सांगतात उत्तम आरोग्यासाठी फॉलो करा ५ गोल्डन रुल्स, मधुमेह-लठ्ठपणाचा होणार नाही त्रास

स्ट्रेसपासून राहा दूर

तणावाचा आपल्या खाण्याच्या सवयी, हार्मोन्स आणि वजनावरही परिणाम होतो. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तणावापासून दूर राहणे गरजेचं आहे. जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा, शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात. शिवाय चयापचय क्रियावरही परिणाम होतो. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते. यासाठी मेडीटेशन करा.

वॉकिंग

वजन कमी करण्यासाठी वॉकिंग महत्वाचे आहे. सध्या अनेकांची बैठी जीवनशैली झाली आहे. ज्यामुळे बरेच जणांना व्यायाम करायला मिळत नाही. या करणामुळे वजन तर वाढतेच, शिवाय आरोग्यही बिघडते. त्यामुळे नियमित वॉकिंग करा. निदान १० हजार पावलांचं टार्गेट ठेवा.

सकाळी चुकूनही खाऊ नका ६ पदार्थ, शरीराच्या अनेक अवयवांना होईल त्रास, वजन-कोलेस्टेरॉलही वाढेल झपाट्याने

८ वाजेच्या आत करा डिनर

वजन कमी करताना वेळेवर जेवण करणं गरजेचं आहे. तज्ज्ञांच्या मते. रात्रीचं जेवण ७ ते ८ वाजेच्या दरम्यान करावे. डिनर आणि ब्रेकफास्टमध्ये १२ तासांचा अंतर असावा. लवकर जेवण केल्याने अन्न व्यवस्थित पचते. शिवाय पचनक्रिया सुरळीत कार्य करते. दरम्यान, डिनर केल्यानंतर २ तासानंतरच झोपा. जेवण केल्यानंतर लवकर झोपणे टाळा, जेवल्यानंतर शतपावली करा.

टॅग्स :वेट लॉस टिप्सनववर्षफिटनेस टिप्सअन्न