Join us  

How to Lose Weight Fast :  रोज चालायला जाऊनही वजन कमी होत नाही? दिवसभराच्या रूटीनमध्ये १ बदल करा, नेहमी मेंटेन, फिट राहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 1:25 PM

How to Lose Weight Fast : अनेकजण बारीक होण्यासाठी रोज मॉर्निंग वॉकला जातात पण त्याचाही फारसा उपयोग होत नाही असं दिसून येतं. 

वजन वाढणे हा सध्याच्या काळातील सर्वात मोठा चिंतेचा विषय असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. जास्त वजनामुळे हृदयविकार, मधुमेह यांसारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. यामुळेच सर्व लोकांना असे उपाय नियमितपणे करत राहण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून वजन नियंत्रित ठेवता येईल. (Weight Loss Tips)  जास्त वजन, हृदयाचे विकार, मधुमेह किंवा इतर अनेक समस्यांना निमंत्रण देते. खासकरून महिला आपल्या वजनााबाबत फारश्या जागरूक नसतात. रोजच्या धावपळीच्या जीवनात वजन वाढत चाल्लंय किंवा शरीरावरचे अतिरिक्त चरबी वाढत चाललीये याकडे अजिबात लक्ष नसतं. (Habits that help you lose weight tips for lose weight) अनेकजण बारीक होण्यासाठी रोज मॉर्निंग वॉकला जातात पण त्याचाही फारसा उपयोग होत नाही असं दिसून येतं. 

आजच्या काळात वजन वाढण्यामागे बैठी जीवनशैली हे प्रमुख कारण मानले जात असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याशिवाय जंक फूडचे अतिसेवन यांसारख्या सवयींमुळेही हा धोका वाढत आहे. तुमच्या दिनचर्येत काही बदल केल्यास तुमचे वजन कमी होऊ शकते आणि सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर राहता येते. चला जाणून घेऊया त्या सवयींबद्दल, ज्याचा वापर करून तुम्हाला फायदे मिळू शकतात. (Weight Loss Tips)

बैठी जीवनशैली

असं म्हटलं जातं की बैठी जीवनशैली हे वजन वाढण्याचं मुख्य कारण मानलं जातं, त्यामुळे तुम्ही नियमित व्यायाम केला पाहिजे. सकाळी काही हलकी ते मध्यम शारीरिक हालचाली केल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. जास्त वजन असलेल्या 50 महिलांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की एरोबिक व्यायाम वजन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. सकाळी व्यायाम केल्याने दिवसभर ऊर्जेची पातळी राखण्यास मदत होते, तसेच रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते.

कधी जळजळ तर कधी पांढरं पाणी? उन्हाळ्यात त्रासदायक UTI इन्फेक्शन टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी

भरपूर पाणी प्या

जर तुम्हीही दिवसभर थोडेच  पाणी प्यायले तर तुमच्या या सवयीमुळे अनेक समस्या वाढू शकतात. त्यातील वजन वाढणे ही एक आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की 500 मिली पाणी पिल्याने चयापचय दर सरासरी 30% वाढतो. आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे की जास्त वजन असलेल्या स्त्रिया त्यांच्या आहारात किंवा व्यायामाच्या दिनचर्यामध्ये कोणतेही बदल न करता, दररोज एक लिटर जास्त प्यायलानं. एका वर्षात 2 किलोपर्यंत वजन कमी करण्यात मदत झाली. पुरेशा प्रमाणात पाणी पिणे देखील शरीराचे आरोग्य अनेक स्तरांपेक्षा चांगले राखण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

चांगली झोप घ्या

वजन कमी करण्यासाठी केवळ शारीरिकदृष्ट्या काही करणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर तसे नाही, तुमच्यासाठी झोपही तितकीच महत्त्वाची आहे. अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या लोकांची झोपेची गुणवत्ता कमी आहे त्यांना इतर लोकांपेक्षा वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. तुम्‍हाला शारिरीक आणि मानसिक दृष्‍टीया तंदुरुस्त ठेवण्‍यासाठी झोप आवश्‍यक मानली जाते. उत्तम आरोग्यासाठी रोज रात्री किमान आठ तासांची झोप घ्या.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स