Lokmat Sakhi >Fitness > व्यायाम करूनही तब्येत कमी होत नाहीये? ३ स्टेप फॉर्म्यूला; झरझर वजन घटेल, सुडौल दिसाल

व्यायाम करूनही तब्येत कमी होत नाहीये? ३ स्टेप फॉर्म्यूला; झरझर वजन घटेल, सुडौल दिसाल

How to Lose Weight Fast in 3 Simple Steps : आजारांपासून बचाव करण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 11:27 AM2023-03-14T11:27:35+5:302023-03-14T12:52:12+5:30

How to Lose Weight Fast in 3 Simple Steps : आजारांपासून बचाव करण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

How to Lose Weight Fast in 3 Simple Steps : What is the best tips for weight loss | व्यायाम करूनही तब्येत कमी होत नाहीये? ३ स्टेप फॉर्म्यूला; झरझर वजन घटेल, सुडौल दिसाल

व्यायाम करूनही तब्येत कमी होत नाहीये? ३ स्टेप फॉर्म्यूला; झरझर वजन घटेल, सुडौल दिसाल

प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढलं की आजारही वाढू लागतात. फिट, निरोगी राहण्यासाठी वजन नियंत्रणात असणं खूप गरजेचं असतं. (Weight Loss Tips) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्या (WHO) आकडेवारीनुसार जगभरातील करोडो लोक जास्त वजन, लठ्ठपणाचा सामना करत आहेत.  आजारांपासून बचाव करण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हेल्दी आणि सुरक्षित पद्धतीनं वजन कमी करण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकतात. (How to Lose Weight Fast in 3 Simple Steps)

हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार वजन नेहमी अशा मार्गांनी कमी करायला हवं जे मार्ग  शास्त्रियदृष्ट्या  योग्य आहेत. चुकीच्या पद्धतीनं वजन कमी करणं धोकादायक ठरू शकतं. खाण्यापिण्यातील किंवा जीवनशैलीत काही बदल करून तुम्ही सोप्या पद्धतीनं वजन कमी करू शकता. लवकरच तुम्हाला याचे सकारात्मक परिणामही दिसून येतील. (Weight Loss Top 3 Secrets You Should Know)

वजन कमी करण्याचा ३ स्टेप फॉर्म्यूला 

१) आपल्या आहारात रिफाईंड कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी ठेवा. असं केल्यानं तुम्हाला भूक कमी लागेल आणि इंन्सुलिन लेव्हल कमी होण्यास मदत होईल. कमी कॅलरीजयुक्त खाणं वजन कमी करण्याासठी फायदेशीर ठरू शकतं.

बारीक व्हायचंय पण डाएट, व्यायामाचा कंटाळा येतो? ५ टिप्स, झरझर घटेल वजन, स्लिम दिसाल

२) वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात प्रोटिन्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. व्हेजिटेरियन लोक प्रोटीन्यसुक्त पदार्थ सोयाबीन, क्विनोआ आणि टोफू खाऊ शकतात. नॉनव्हेज खात असलेले लोक मीट, चिकन, मासे सीफूडचा आहारात समावेश करू शकतात.

हेल्दी फॅट्स मिळवण्यासाठी हिरव्या भाज्या खा. याव्यतिरिक्त ब्रोकोली, फुलकोबी, टोमॅटो, पत्ता कोबी, काकडीचं सेवन करा. यामुळे शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्व मिळतील आणि वजन वेगान कमी होण्यास मदत होईल. 

कॅल्शियम कमी झालंय? ८ पदार्थ खा, ठणठणीत राहील तब्येत; कमी खर्चात मिळेल पोषण

३) व्यायाम केल्यानं तुम्ही वेगानं वजन कमी करू शकता.  वेट लिफ्टींग वजन कमी करण्यासाठी आणि कॅलरीज बर्न करण्यासाठी फायदेशीर मानली जाते. यामुळे कॅलरीज बर्न होऊन मेटाबॉलिझ्म संथ होण्यास मदत होते. आठवड्यातून  ३ ते ४ वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. याशिवाय कार्डिओ वर्कआऊट रनिंग, सायकलिंग आणि स्विमिंग करून तुम्ही तब्येत निरोगी ठेवू शकता. 

Web Title: How to Lose Weight Fast in 3 Simple Steps : What is the best tips for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.