लठ्ठपणा ही जागतिक समस्या जरी, असली तरी त्यावर कंट्रोल असणं गरजेचं आहे. नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेणं आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहून किंवा जास्त व्यायाम करून शरीर थकवणे योग्य नाही. ज्यामुळे शरीरात न्यूट्रिशन्सची कमतरता भासू शकते. व्यायाम आणि योग्य आहार घेऊनही अनेकदा वजन कमी होत नाही. आपल्याकडून अनेक चुका घडतात, ज्यामुळे वजन कमी होत नाही.
त्या नकळत घडणाऱ्या चुका कोणत्या? वजन कमी करताना कोणत्या टिप्स फॉलो कराव्या? यासंदर्भात आहारतज्ज्ञ सिमरन कौर यांनी ५ टिप्स शेअर केल्या आहेत. या ५ टिप्स २१ दिवस फॉलो करून पाहा. यामुळे शरीरात घडणारे बदल दिसून येईल. व शरीरात पोषण तत्वांची कमतरता देखील भासणार नाही(How to Lose Weight Fast in 5 Simple Steps, Follow Weight Loss rules for 21 Days).
ब्रेकफास्टमध्ये करा काही खास बदलाव
रात्रीचे जेवण आणि नाश्ता यात अंतर असतो. अशा परिस्थितीत शरीराला ऊर्जा देण्यासाठी नाश्ता खूप महत्त्वाचा ठरतो. हे चयापचय सुधारते. यासह मिड-मॉर्निंग क्रेविंग्स देखील कमी करण्यास मदत करते. सकाळच्या नाश्त्याला प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त फुड्स खा. यासह काही फ्रुट्स देखील खा.
एक समोसा खाल्ल्याने आरोग्यावर किती परिणाम होतो? कॅलरीज बर्न करण्यासाठी काय करायला हवे?
१०,००० पावले चाला
वजन कमी करण्यासाठी शरीराची हालचाल महत्वाची. यासाठी दररोज १०,००० पावले चाला. २१ दिवस न चुकता चाला. यामुळे शरीराला याची सवय लागेल. जर सरुवातीला १०,००० पावले चालणे शक्य नसेल तर, पाऱ्यांपासून सुरुवात करा. नंतर १०,००० पावले गाठा.
लीन प्रोटीन खाण्याचा प्रयत्न करा
लीन प्रोटीन आपल्याला वजन कमी करण्यास मदत करू शकते. यामुळे लवकर भूक लागत नाही. प्रत्येकवेळी जेवणाच्या ताटात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा.
भरपूर झोपा, वजन घटेल झटपट! नव्या संशोधनाचा दावा, झोपण्यापूर्वी ४ गोष्टी करा-वजन घटेलच..
भरपूर पाणी प्या
वजन कमी करताना तज्ज्ञ भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. शरीराला पाणी खूप आवश्यक आहे. पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते. यासह इतर अनेक समस्याही दूर होतात. साखरयुक्त पेयांऐवजी पाणी प्या.
पोर्शन कंट्रोल करा
पोर्शन कंट्रोल करणे ही गोष्ट लहान जरी वाटत असली तरी, यामुळे वजन कमी करताना खूप मदत होते. आपण काय खात आहोत, यापेक्षा किती खात आहोत यावर लक्ष द्या. डिनरमध्ये कमी पण पौष्टीक पदार्थ खा. कधीच उपाशी राहू नका.