Join us  

महिनाभरात कमी होईल पोटाची वाढलेली चरबी; वेट लॉस कोचचे ६ उपाय, दिसाल सुडौल-स्लिम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2023 11:35 AM

How to Lose Weight Fast in 6 Simple Steps : फिटनेस ट्रेनर रोहित खत्री यांनी एका महिन्यात  फॅट लॉस करण्यासाठी ६ उपाय सांगितले आहेत.

एखादा कार्यक्रम किंवा लग्न असेल तर त्या कार्यक्रमाला आपण उठून दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं.  ज्याचं वजन खूपच जास्त असतं त्यांना वजन कमी करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. फिटनेस ट्रेनर, डाएट प्लॅन याचा खर्च सगळ्यांनाच  परवडतो असं नाही. (Weight Loss Tips) यासाठी सोप्या वेट लॉस टिप्स फायदेशीर ठरू शकतात. फिटनेस ट्रेनर रोहित खत्री यांनी एका महिन्यात  फॅट लॉस करण्यासाठी ६ उपाय सांगितले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार नियमित हे उपाय करून तुम्ही हवी तशी फिगर मिळवू शकतात.  तुमचे सातत्य आणि मेहनत यावर परीणाम अवलंबून असतील. (How to Lose Weight Fast in 6 Simple Steps)

कॅलरीज कमी करा

तुम्ही जितक्या कॅलरीज बर्न करत आहात त्यापेक्षा कमी कॅलरीजचे सेवन करा. सर्व कॅलरीज प्रोटीन्सच्या स्वरूपात असू नयेत. लोक आहारात प्रोटीन्स वाढवून कार्ब्स आणि फॅट्स काढून टाकतात पण वजन कमी करण्यासाठी बॅलेंन्स डाएट घ्यायला हवा. ज्यात प्रोटीन्सबरोबर हेल्दी कार्ब्स, हेल्दी फॅट्सचा समावेश असायला हवा.

कार्डीओ

कॅलरीज बर्न करण्यासाठी कार्डिओ बेस्ट व्यायामप्रकार आहे. वेट लॉस करण्यासाठी फिटनेस ट्रेनर सकाळी रिकाम्या पोटी कार्डिओ करण्याचा सल्ला देतात. माऊंटेन क्लाईंबर्स, फ्रॉग जंप, जंपिंक जॅक, स्प्रिंट यांसारखे कार्डीओ व्यायाम प्रकार फॅट लॉस करण्यास मदत करतात. जे तुम्ही घरच्याघरीही करू शकता.

रात्री काय खाताय याकडे लक्ष द्या

फिटनेस ट्रेन सांगतात फॅटबर्न करण्यासाठी हलका फुलका आहार घ्या. रात्री कार्ब्स खाणं बंद करायला हवं. रात्रीच्या जेवणता फक्त सॅलेड, प्रोटीन्सरिच पदार्थांचा समावेश असावा. झोपण्याच्या २-३  तास आधी जेवण करा.

दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी प्या

दिवसभर पुरेसे पाणी प्यावे. हे तुमचे चयापचय उच्च ठेवण्याबरोबरच तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास देखील मदत करेल. इतकेच नाही तर हे कॅलरी-मुक्त पेय आहे, जे भूक कमी करण्यास मदत करते.

७ ते ८ तासांची झोप घ्या

तुम्हाला पोटाची चरबी काढून टाकायची आहे किंवा मांडीची चरबी नको असले तर  तुम्ही दररोज पुरेशी झोप घेतली पाहिजे. हे स्नायूंच्या दुरुस्तीसह कॅलरी बर्न करण्यास मदत करते. तुम्ही दररोज ७-८ तासांची झोप घेतली पाहिजे.

चीट मील

चीट जेवण तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करताना तुमच्या आहार आणि दिनचर्येला चिकटून राहण्यास मदत करते. 15-20 दिवसातून एकदा तुम्ही चीट मील घेऊ शकता आणि त्यातही सर्व अन्न स्वच्छ असावे. कोणत्याही प्रकारचे जंक किंवा प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळा.

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स