वजन कमी करणं सध्याच्या स्थितीत खूपच कठीण झालंय. व्यायामाबरोबर हेल्दी डाएट घेणंही तितकंच महत्वाचं असतं. उन्हाळ्याच्या दिवसात आधीच खूप घाम येत असतो अशात व्यायाम करण्याचीही इच्छा होत नाही. जास्त घाम आल्यानं तुम्हाला डिहायड्रेशनही होऊ शकतं. (Weight Loss Tips) जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात व्यायाम करून वजन कमी करणार असाल तर डाएटवर जास्त लक्ष द्यायला हवं. (How to lose weight in summer)
काहीजण वजन कमी करण्यासाठी चालतात तर काहीजण स्विमिंग करतात. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पोषणतज्ज्ञ मलिका सिंह यांनी अशा काही सुपर फूड्सबद्दल सांगितले आहे. ज्याचे सेवन करून तुम्ही बेली फॅट घटवू शकता. यामुळे संपूर्ण शरीरातील चरबी घटवण्यास मदत होईल. ( Include these 5 foods in your diet to lose extrabelly fat)
नारळपाणी
नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाईट्स असतात. ज्यामुळे शरीर तंदरुस्त आणि थंडगार राहण्यास मदत होते. या पावर ड्रिंकमध्ये इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे संपूर्ण दिवस हायड्रेट राहिल्याप्रमाणे वाटते. नारळ पाणी प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
चपात्या वातड होतात? मऊ, पापुद्रा सुटलेली, घडीची चपाती करण्याची योग्य पद्धत, पाहा सोपं सिक्रेट
सिजनल फ्रुट्स
वजन कमी करण्यासाठी तुम्ही सिजनल फ्रुट्सचा आहारात समावेश करू शकता. उन्हाळ्याच्या दिवसात मोसमी फळं म्हणजेच कलिंगड, खरबूज, द्राक्ष ही फळं खायला हवीत. यात पाण्याचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीराला गारवाही मिळतो.
आईस टी
आईस्ड टी किंवा आईस्ड कॉफी एक बेस्ट समर ड्रिंक आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. यात तुम्ही पुदिना, लिंबू, पीच आणि काही बेरीज मिसळू शकता. चांगले पचन आणि वजन कमी करण्यासाठी दररोज आईस टि प्या.
लघवी रोखून धरण्याची सवय आहे? ४ धोके युरिन इन्फेक्शन पासून किडनीचे आजार होण्याचा धोका..
सातू, दही, ताक
सातूचे हे पेय उन्हाळ्यात एक उत्तम उपाय आहे कारण ते थंड, हायड्रेटिंग आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने भरपूर असलेले हे पेय शरीरातील पौष्टिकतेची कमतरता पूर्ण करते. त्याचप्रमाणे, ताक आणि दही प्रोबायोटिक्स, प्रथिने आणि कॅल्शियमने समृद्ध असतात, जे स्नायूंच्या वाढीसाठी आणि मजबूत हाडे आणि पचन सुधारण्यासाठी आवश्यक असतात.
सॅलेड
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी सॅलेड खाणे हा एक उत्तम उपाय आहे. तुमच्या जेवणात गाजर, मुळा, काळे, काकडी आणि बीटरूट यांसारख्या पालेभाज्यांचा समावेश करा. याशिवाय, स्प्राउट्सचे सेवन देखील करा कारण ते कॅरोटीनॉइड्समध्ये समृद्ध असतात ज्याचे शरीर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते. कोशिंबीर पचनक्रिया मजबूत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील सुधारते. तुम्ही तुमच्या सॅलेडमध्ये व्हिटॅमिन सी युक्त लिंबूवर्गीय फळांचा समावेश करू शकता.