शरीराच्या विविध भागांमध्ये फॅट्स जमा झाल्याने शरीर बेढब दिसतं. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं, जेवणाच्या वेळा चुकल्या की वजन वाढत जातं. सतत बसून बसून पोटाची चरबी वाढत जाते. याला फॅट्स असं म्हणतात लठ्ठपणा, शुगर, हार्ट डिसीज ही सगळ्यात मोठी कारणं आहेत. (Indian spices that can help you in weight loss)
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात बरेच लोक असतात. वजन कमी करण्यासाठी कोणी कॅलरीज इन्टेक कमी करतं, कोणी फिजिकल व्यायाम करतं तर कोणी लाईफस्टाईल बदलतं. आहार फार महत्वाचा आहे. आहारात काही पदार्थांचा समावेश करून तुम्ही लठ्ठपणा कमी करू शकता. (Powerful Herbs For Weight Loss And Their Benefits)
आलं
आल्याचा समावेश सगळ्याच भाज्यांमध्ये केला जातो. आल्यात अर्मोजेनेसिस असते. हे बॉडी टेंम्परेचर वाढवतात. ज्यामुळे जास्तीत कॅलरीज बर्न करण्यास मदत होते. यामुळे भूक कमी लागते. याशिवाय कोलेस्टेरॉल शुगर, ब्लड प्रेशर कमी होतं.
रात्रीच्या जेवणात चपाती खावी की भात? वजन कमी करण्यासाठी काय उत्तम, तज्ज्ञ सांगतात...
लसूण
लसूण आपल्या आहाराचा मुख्य भाग आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही आहारात लसणाचा समावेश करू शकता. नियमत लसूण खाल्ल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. यातील एलिसी कंपाऊंट मेटाबॉलिझ्म वेगाने वाढवते. यामुळे फॅटस एनर्जीमध्ये कन्वर्ट होतात.
मोहोरी
मोहोरी पोषक तत्वांचा खजिना असतात. त्यात व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन सी, अनेक प्रकारची खनिजे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. हे सर्व चयापचन गतिमान करून ऊर्जा उत्पादन वाढवतात. सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी ग्लासभर कोमट पाण्यात दालचिनी पावडर आणि आलं घालून मिसळा मग या पाण्याचे सेवन करा. आलं, लसूण तुम्ही इतर भाज्यांसाठी वापरू शकता. तर मोहोरी भाज्या, चटण्या इत्यादीत मिसळून खा. याव्यतिरिक्त भाजीतही तुम्ही खाऊ शकता.
दातांना किड लागली? ४ सोपे उपाय, दातदुखी-हिरड्यांची सूज होईल कमी, दात राहतील ठणठणीत
हळद
हळदीतील पोषक तत्व वजन कमी करण्यास मदत करतात. हळदीत पॉलिफेनॉल, करक्यूमिन कम्पाऊंड असतात. ज्यामुळे फॅट्स कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी हळदीचं पाणी बनवून प्या.