Lokmat Sakhi >Fitness > बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल

बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल

How to lose weight while dining at restaurants for every meal : मन मारून बाहेरचं खाणं टाळताय? खाताना लक्षात ठेवा एक सोपा रूल, वजन वाढण्याचं टेन्शन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2024 09:27 PM2024-02-05T21:27:54+5:302024-02-05T21:28:52+5:30

How to lose weight while dining at restaurants for every meal : मन मारून बाहेरचं खाणं टाळताय? खाताना लक्षात ठेवा एक सोपा रूल, वजन वाढण्याचं टेन्शन सोडा

How to lose weight while dining at restaurants for every meal | बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल

बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल

वजन कमी (Weight Loss) आणि वेट मेन्टेन ठेवण्यासाठी व्यायाम यासह आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जर आपण फक्त व्यायामाकडे लक्ष देऊन, आहाराकडे दुर्लक्ष करत असाल तर, वजन नक्कीच वाढू शकते. अनेकदा आपल्याला बाहेर खाण्याची इच्छा होते. आपण हॉटेलमध्ये जावून विविध पदार्थांची चव चाखतो. पण बाहेरचं हॉटेलमधलं चमचमीत पदार्थ खाल्ल्याने वजन वाढते असे म्हटले जाते (Weight Loss Tips). पण खरंच याने वजन वाढते का? आणि जर वजन वाढत असेल तर, मन मारून चमचमीत पदार्थ खाणं टाळावं का?

जर आपल्याला मन मारून जगायचं नसेल, आणि आवडीचे पदार्थ खायचे असेल तर, आहारतज्ज्ञ मनोली मेहता यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा. या टिप्समुळे बाहेरचं चमचमीत पदार्थ खाऊनही वजन वाढणार नाही(How to lose weight while dining at restaurants for every meal).

हॉटेलमधलं चमचमीत खाण्यापूर्वी लक्षात ठेवा काही गोष्टी

- एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, जर आपल्याला मन न मारता, हॉटेलमधलं चमचमीत पदार्थ खाऊनही वजन वाढू नये असे वाटत असेल तर, ४-३-२-१ चा वेट लॉस रूल फॉलो करा. या वेट लॉस रूलमुळे वजन तर वाढणार नाही, शिवाय पचनक्रियेतही अडथळे येणार नाही.

जॅकी श्रॉफला आवडते वाफेवर शिजवलेली वांग्याबटाट्याची भाजी, पाहा चमचमीत रेसिपी

- जर आपल्याला गोड पदार्थ खायला आवडत असेल तर, तर स्वीट डिशमधले फक्त ४ चमचे खा. यामुळे आपले मन भरेल, शिवाय जास्त खाणेही टळेल.

- जर आपल्याला हॉटेलमधलं खायचं असेल तर, लंच टाईममध्ये खा. कारण आपली दिवसभरात बरीच हालचाल होते. ज्यामुळे वजन झपाट्याने वाढण्याची शक्यता कमी होते. पण जर आपल्याला डिनर करायचं असेल तर, बेडटाईमच्या ३ तास आधी डिनर करा. जेवल्यानंतर लगेच झोपणे टाळा.

- डिनरनंतर शतपावलीला जरूर जा. जर आपण डिनर हॉटेलमध्ये करत असाल तर, निदान १०० पावले चाला. यामुळे वजन वाढणार नाही, शिवाय खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचेल.

कार्तिक आर्यनने सोडली वर्षभरासाठी साखर, साखर सोडल्याने खरंच ब्लड शुगर आणि वजन कमी होते की..

-  जर आपण हॉटेलमध्ये जेवायला जात असाल तर, प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थ खा. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतील. पदार्थातील पौष्टीक घटकांमुळे वजनही वाढणार नाही.

- बऱ्याचदा जेवल्यानंतर ब्लोटिंगची समस्या निर्माण होते. असे होऊ नये म्हणून उकळत्या पाण्यात आलं घाला. आल्याचे पाणी प्यायल्याने अपचन दूर होईल. शिवाय खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचेल.

Web Title: How to lose weight while dining at restaurants for every meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.