आपण स्लिम दिसावं कपडे जास्त घट्ट होऊ नयेत असं प्रत्येकालाच वाटतं. वजन जास्त वाढल्यानं फक्त पर्सनॅलिटीवरच परिणाम होत नाही तर आरोग्यावरही परिणाम होतो. होमियोपेथी डॉक्टर मुकेश बत्रा यांनी एका हिंदी वेब पोर्टलशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How to lose weight without exercise) ब्लड शुगर, हाय कोलेस्टेरॉल, डायबिटीस, डार्ट डिसिज, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका टाळण्यासाठी वेळीच वजन कमी करण्याकडे लक्ष द्यायला हवं. (5 Best homeopathic remedies for weight loss)
लठ्ठपणा कमी कसा करायचा?
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करा. रोज व्यायाम करायला हवा. योगासनं, घरगुती उपाय करून तुम्ही लठ्ठपणापासून आराम मिळवू शकता. लठ्ठपणासाठी काही होमिओपॅथिक उपाय देखील आहेत, ज्यामुळे वजन अधिक चांगल्या पद्धतीने आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय कमी करता येते.
फायबर्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा
डॉक्टर बत्रा यांनी सांगितलं की वजन कमी करण्यासाठी आहारात फायबर्सयुक्त पदार्थांचे अधिकाधिक सेवन करायला हवे. फायबर्सयुक्त पदार्थ केवळ वजन कमी करत नाही तर त्यामुळे मेटाबॉलिज्म वाढतो. आतड्यांची स्वच्छता होते. पचनक्रिया मजबूत राहते. वजन लवकर कमी होण्यास मदत होते. याशिवाय फळं, भाज्या डाळींचे सेवन केल्यानं पोटाचे आरोग्यही चांगले राहते.
प्रोसेस्ड फूडपासून लांब राहा
प्रोसेस्ड फूडमुळे चरबी वेगानं वाढते. पिज्जा, बर्गर, चिप्स, फ्रेंच फ्राईज, डोनट यांसारख्या पदार्थांमध्ये मैद्याचे आणि साखरेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो.
थोड्या थोड्या वेळानं खा, जास्त खाऊ नका
खूप लोकांना तीनपेक्षा जास्त वेळा खाण्याची सवय असते. डॉक्टरांच्यामते लठ्ठपणा कमी करण्यासाठी सतत खात राहणं टाळावं. ठराविक अंतरानंतर खात राहा. २ ते ३ तासांनी खात राहिल्यानं मेटाबॉलिझ्म बुस्ट करण्यास मदत होते.
जास्त ताण घेऊ नका
ताण तणावामुळे झोप न लागण्याची समस्या उद्भवू शकते. व्यवस्थित झोप घेतली नाही तर वजन वाढतं. तणावमुक्त राहण्यासाठी आणि क्रेव्हींग्स कमी करण्यासाठी अधिक ताण न घेण्याच सल्ला दिला जातो.
इतर उपाय
लठ्ठपणापासून सुटका मिळवण्यासाठी काही होमिओपेथी उपाय सुरक्षित आहेत कारण याचे कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवत नाहीत.