वजन वाढणं ही सध्याची खूप कॉमन समस्या झाली आहे. एकदा वजन वाढलं की कमी होता होत नाही. वजन कमी करण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं उपलब्ध असली तरी तुम्ही रोजच्या जेवणाला काय खाता, तुमची जीवनशैली कशी आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. (Morning routine for belly and arm fat loss) आपण मेंटेन, स्लिम दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यासाठी काहीजण चालायला जातात तर काहीजण रोज धावायला जातात. (Weight Loss Tips)
याशिवाय काहीजण रोज सकाळी लिंबू आणि मध घातलेलं गरम पाणी पितात. शरीर बारीक दिसत असलं तरी अनेकांच्या पोटाची चरबी वाढत जाते. अशावेळी कपडे पोटावर घट्ट बसतात. जीन्सचे बटन्स व्यवस्थित लागत नाहीत. मॉर्निंग रूटिन फॉलो करून तुम्ही वेगानं वजन कमी करू शकता. लाईफ स्टाईल चांगली ठेवून तुम्ही वजन कमी करू शकता. या सवयींमुळे तुमचं पूर्ण शरीरातील फॅट लॉस होण्यास मदत होते.
झोप चांगली घ्या
सकाळी लवकर उठण्याची सवय चांगली असते पण तुम्ही रात्री कधी झोपता हे सुद्धा महत्वाचं असतं. जर तुम्ही रात्री उशीरा झोपून सकाळी लवकर उठत असाल तर झोप पूर्ण होत नाही. याशिवाय वजन कमी होण्याच्या प्रयत्नातही अडथळे येतात. यासाठी झोप पूर्ण घ्या.
पाणी भरपूर प्या
सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी कोमट पाणी प्या. हलकं कोमट पाणी फॅट्स बर्न करण्यास फायदेशीर ठरतं. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. याशिवाय फॅट्स बर्न होण्यासाठी ओव्याचं पाणी, मध, लिंबांचे पाणी किंवा जिऱ्याचं पाणी पिऊनही दिवसाची सुरूवात करू शकता.
नाश्ता हेल्दी ठेवा
सकाळचा नाश्ता असा असायला हवा जेणेकरून तुमचं पोट दिवसभर भरलेलं राहील आणि दुपारपर्यंत तुम्हाला एनर्जी मिळेल. वजन कमी करण्यासाठी फायबर्स आणि प्रोटीन्सयुक्त पदार्थाचा आहारात समावेश करा. जर तुम्हाला फिट राहायचं असेल तर वजन कमी करण्यासाठी सकाळी पोहे, उपमा, मुगाच्या डाळीचा डोसा, अंड, डाळी, ओट्स, स्टफ्ड पराठे, फ्रुट सॅलेड, फळांचा रस प्या.
जेवल्यानंतर एक काम करा
जेव्हा दिवसभरात कोणतंही अन्न खाता त्यानंतर २० मिनिटांनी कोमट पाण्याचे सेवन करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाल्ल्यानंतर २० मिनिटं वॉक करा. या दोन्हींमुळे वजन वेगानं कमी होण्यास मदत होईल. दिवसभरात तुम्हाला चालायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळी चालू शकता.