फिट दिसण्यासाठी तर काहीजण आपण वजन वाढू नये म्हणून योगा करतात. योगा शरीराला बाहेरून आणि आतून दोन्ही बाजूंनी मजबूत बनवते. (Simple Ways to Lose Belly Fat) यामुळे फक्त शारीरिक नाहीतर मानसिक आरोग्यही चांगले राहते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणिं कंबर, मांड्यावर जमा झालेलं एक्स्ट्रा फॅट घटवण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे. (Effective Tips to Lose Belly Fat)
सतत बाहेरचं खाऊन, ८ ते ९ तास काम करून तुमचंही पोट बाहेर आलं असेल तर तुम्ही त्रिकोणासन करू शकता. यासाठी तुम्हाला योगा क्लासेस किंवा जिमला जाण्याची काही गरज नाही. त्रिकोणासन घरच्याघरी करून तुम्ही वजनावर (Trikonasana) नियंत्रण ठेवू शकता.
बेली फॅट घटवण्यासाठी त्रिकोणासन
त्रिकोणासन करण्यासाठी तुमचं पोट रिकामं असेल तर उत्तम. जेवण आणि त्रिकोणासन यात कमीत कमी ४ ते ६ तासाचं अंतर हवं. त्रिकोणासनं करण्यासाठी सकाळची वेळ उत्तम आहे. सकाळी अजिबात वेळ मिळत नसेल तर तुम्ही संध्याकाळी त्रिकोणासनं करू शकता.
ओटी पोट लटकतंय, फिगर पूर्ण बिघडली? रोज सकाळी ४ गोष्टी करा, आपोआप स्लिम-फिट दिसाल
त्रिकोणसान करण्यासाठी सगळ्यात आधी पायांमध्ये अंतर ठेवून उभं राहा. त्यानंतर हातांना खांद्याच्या लेव्हलपर्यंत घेऊन या. नंतर हात डाव्या पंज्यापर्यंत घेऊन या त्यानंतर दुसरा हात वरच्या बाजूने सरळ ठेवा. हे आसन करताना शरीराचा आकार त्रिकोणाप्रमाणे दिसायला हवा. सामान्य स्थितीत या आणि दीर्घ श्वास घ्या. त्यानंतर श्वास सोडताना सरळ उभे राहा. एकावेळी ५ ते ६ वेळा हे आसन करा.
त्रिकोणासनाचे फायदे
पोट कमी करण्यासाठी त्रिकोणासन केले जाते. याव्यतिरिक्त त्रिकोणासन करण्याचे अनेक फायदे आहेत. त्रिकोणासन केल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो. यामुळे संपूर्ण शरीरातील फॅट बर्न होण्यास मदत होते. हा योगा प्रकार केल्याने पचनक्रिया चांगली राहते.
तब्येतीसाठी वरदान आहेत ५ साधेसोपे फूड कॉम्बिनेशन्स, रोज खा, पोट कमी होईल- राहा नेहमी निरोगी
याशिवया हिप्स जॉईंट्ससाठी सुद्धा हे योगासन फायदेशीर ठरते. या व्यतिरिक्त स्टॅमिना, बॅलेंस आणि एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी हे आसन गुणकारी आहे. सतत बसून पाठदुखीचा त्रास वाढला असेल तर हे आसन नियमित केल्यास वेदनांपासून आराम मिळेल.