Join us  

पोटावरची चरबी झरझर घटेल; झोपताना ३ गोष्टी करा; महिन्याभरात वजनात दिसेल फरक;

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2023 12:23 PM

How to loss belly fat : आजकाल लवकर जेवण्याची पद्धत खूप कमी कुटुंबांमध्ये दिसून येते.

वजन कमी करणं काही सोपं काम नाही. एकदा वाढलेलं वजन कमी करण्यासाठी क्रेव्हीव्सवर नियंत्रण ठेवून महिनोंमहिने काढावे लागतात. व्यायाम करावा लागतो तेव्हा कुठे शरीरात फरक दिसतो. तुम्ही सकाळी उठल्यानंतर ते झोपेपर्यंत काय खाता हे वजन कमी करण्याासठी फार महत्वाचं असतं. (How to loss belly fat)

आजकाल लवकर जेवण्याची पद्धत खूप कमी कुटुंबांमध्ये दिसून येते. रात्री १० नंतर सगळे जेवतात. अशा स्थितीत जर तुम्ही रात्रीच्या जेवणाला हेवी काहीही खाल्लं तर ते पचायला कठीण असतं. परिणामी पोटावरची चरबी वाढत जाते. जर तुम्हाला पोटाचं फॅट घालवायचं असेल तर रात्री लवकर जेवा आणि रात्रीचे जेवण आणि झोप यात २ किंवा कमीत कमी १ तासाचं अंतर ठेवा.  रात्री चालायला जा. असं केल्यानं पचन व्यवस्थित राहील. (Tips for belly fat loss)

तज्ज्ञांच्या मते, तुम्ही योग्य आहार घेत असाल, व्यायाम करत असाल, पण आरोग्यदायी दिनचर्या पाळली नाही, तर वजन कमी करणे कठीण होऊ शकते. (Foods To Avoid At Night For Weight Loss) वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या कोणत्या गोष्टी कराव्यात याबाबत शिखा शर्मा यांनी माहिती दिली ​​आहे. डॉ. शिखा यांनी एका हिंदी साईटशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.

 रात्रीच्या जेवणात सूप- सॅलेड

रात्री चहा-कॉफीपासून दूर राहा. त्याचबरोबर भाज्यांपासून बनवलेले सूप आपल्या आहारात समाविष्ट करा. तुम्ही रात्रीचे जेवण टाळत असाल तर नक्कीच सूप प्या.

प्रोटीन्स

अनेकजण रात्रीच्या  जेवणात प्रोटिन्सचा समावेश करतात. पण रात्रीच्या जेवणात प्रोटीनयुक्त भाज्याही खाव्यात. जर तुम्ही ऑम्लेट खात असाल तर भरपूर भाज्या घालून बनवा. यामुळे तुम्हाला योग्य प्रमाणात फायबर मिळेल. कार्बोहायड्रेट चयापचय मंद करते. दुसरीकडे, जर तुम्ही कार्बोहायड्रेट किंवा प्रथिनेयुक्त भाज्या घेतल्या तर ते चयापचय मंद होत नाही. 

त्रिफळा चूर्ण

जेव्हा चयापचय मंद होते तेव्हा वजन कमी करणे खूप कठीण होते. त्रिफळा चूर्ण रात्री सेवन केल्यास फायदा होतो. सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि वजन कमी होण्यासही मदत होते.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य