Join us  

पोट सुटलंय, वजन घटत नाहीये? संध्याकाळी ७ नंतर ३ गोष्टी करणं टाळा; महिन्याभरात व्हाल फिट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 9:14 AM

How to loss weight faster : चहा, कॉफी यांसारख्या उत्पादनांमुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब होते आणि फॅट लॉससाठी चांगली झोप घेणं गरजेचं असतं. साखरयुक्त चहामुळे तुमच्या अतिरिक्त कॅलरीजही वाढू शकतात.

वजन कमी करण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असतात. पण पोटाचे टायर्स एकदा वाढले की कमीच होत नाहीत. वजन कमी करण्यासाठी बाजारात अनेक  उत्पादनं उपलब्ध आहेत. (Weight Loss Tips) पण जोपर्यंत तुम्ही जीवनशैलीत बदल करत नाही तोपर्यंत वजन कमी होणं कठीण असतं. व्यायामसाठी वेळ मिळत नसेल तरीही डाएट करून किंवा रोजच्या सवयींमध्ये थोडा बदल करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. ( Do not eat this 3 thing after 7 pm) फिटनेस एक्सपर्ट पवन सिंह आपल्या इंस्टाग्रामपेजवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. (How to loss weight faster)

१) कॅफिनेटेड ड्रिंक्स

 चहा, कॉफी यांसारख्या उत्पादनांमुळे तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब होते आणि फॅट लॉससाठी चांगली झोप घेणं गरजेचं असतं. साखरयुक्त चहामुळे तुमच्या अतिरिक्त कॅलरीजही वाढू शकतात.

२) वेळेवर झोपा

रात्री जास्तवेळ जागल्यामुळे झोप येणं कठीण होतं. जास्तवेळ जागं राहिल्यानं जास्त भूक लागते. अशावेळी तुम्ही चिंटीग करता आणि जास्त खाता यामुळे अतिरिक्त चरबी वाढते

३) फळं खाणं

फळं खाणं तब्येतीसाठी चांगलं असतं पण फळ खाण्याची वेळही तितकीच महत्वाची असते. तुम्ही आहारात सफरचंद, केळी, आंबा, पेअर, चिकू, संत्री, किव्ही, पपई या फळांचा समावेश करू शकता. पण रात्रीच्यावेळी फळं खाणं टाळा. कारण झोपल्यानंतर शरीराची हालचाल होत नसल्यानं शरीरातील फॅट्स वाढू शकतात.

जर तुम्हाला तुमचे पोट कमी करायचे असेल तर कमी कार्बोहायड्रेटयुक्त आहार घ्या. पांढरा तांदूळ, बिस्किटे आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या ब्रेडसारख्या साध्या कार्बोहायड्रेट्समध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते जे हानिकारक असू शकते. म्हणूनच कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट बाजरीची भाकरी, ओट्स किंवा ब्राऊन राईस खाणे आवश्यक आहे.

प्रथिने युक्त आहार घ्या. मूग डाळ हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. 100 ग्रॅम मूग डाळीमध्ये 24 ग्रॅम प्रोटीन असते. प्रथिने वनस्पती आणि प्राणी दोन्ही स्त्रोतांमध्ये आढळतात. कोंबडी, मासे या प्राण्यांच्या स्त्रोतांमध्ये उच्च प्रथिने असतात. दुसरीकडे, प्रथिनांच्या प्रमुख स्त्रोतांमध्ये नट्स, बिया, बटाटे, संपूर्ण धान्य आणि शेंगा यांचा समावेश होतो.

वजन कमी करण्यासाठी दालचिनीचा वापर फायदेशीर ठरेल. हे सकाळी नाश्त्यापूर्वी आणि झोपण्यापूर्वी खाल्ले जाऊ शकते. मधाचे सेवन करा कारण त्यात असलेले आवश्यक हार्मोन्स भूक कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जातात.

टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स