Join us  

How to loss weight faster :  जीम, डाएटचं टेंशन विसरा; रोज रात्री फक्त एक काम केल्यानं लवकर वजन होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 11:27 AM

How to loss weight faster : संशोधनानुसार, जे लोक दररोज एक तास अधिक झोप घेतात त्यांना वजन कमी करण्यात मदत होते. शिकागो विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केले असून त्यांनी हा दावा केला आहे.

सध्याच्या व्यस्त दिनचर्येमध्ये लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही वेळ मिळत नाही. चुकीच्या आहारामुळे वजन वाढणे आणि लठ्ठपणाची समस्या प्रत्येक इतर व्यक्तीला भेडसावत आहे. जास्त वजन हे उच्च रक्तदाब, रक्तातील साखर, हृदयाशी संबंधित आजार, गुडघेदुखीचं कारण ठरू शकते. (Weight loss tips) रात्री चांगली झोप घेणे हे तुमच्या आरोग्यासाठीच चांगले नाही तर लठ्ठपणा कमी करण्यासही ते उपयुक्त ठरते. झोप आणि वजन कमी होणे यांचा दाट संबंध असतो. शिकागो विद्यापीठात नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. (How to loss weight Faster) 

जास्त झोप घेतल्यानं वजन कमी होतं

संशोधनानुसार, जे लोक दररोज एक तास अधिक झोप घेतात त्यांना वजन कमी करण्यात मदत होते. शिकागो विद्यापीठाच्या संशोधकांनी हे संशोधन केले असून त्यांनी हा दावा केला आहे. संशोधकांच्या मते, दररोज रात्री एक तास अतिरिक्त झोप घेतल्याने जास्त वजन असलेल्या लोकांना एका वर्षात सुमारे 3 किलो वजन कमी करण्यास मदत होते. या संशोधनात 21 ते 40 वयोगटातील 80 लोकांचा समावेश करण्यात आला होता, जे दररोज 6.5 तासांपेक्षा कमी झोपतात.

ब्रेस्ट कॅन्सरचं कारण ठरतात साधी वाटणारी ५ लक्षणं; गंभीर आजार टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या

१ तासापेक्षा जास्त झोप घेतल्यास २७० कॅलरीज

ज्या लोकांचा अभ्यास करण्यात आला त्यांनी प्रथम स्मार्ट घड्याळांद्वारे त्यांची झोपेची पद्धत तपासली आणि नंतर त्यांच्या लघवीतून घेतलेल्या कॅलरीजचा मागोवा घेतला. संशोधनात असे आढळून आले की जे लोक दिवसातील 1.2 तासांपेक्षा जास्त म्हणजेच 1 तास 20 मिनिटे झोपतात त्यांनी 270 कमी कॅलरी वापरल्या.

अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की असे केल्याने एका वर्षात 4 किलो (8-9 एलबीएस) कमी केले जाऊ शकते. अभ्यासाच्या लेखिका डॉ. इसरा तासाली यांच्या मते, पुरेशी झोप दीर्घकाळ घेतल्यास आणि ही सवय दीर्घकाळ टिकवून ठेवल्यास वजन कमी करता येते. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी कॅलरीज कमी करण्याचे मार्ग शोधत आहेत, परंतु दररोज फक्त काही तास अतिरिक्त झोप घेतल्याने वजन कमी होऊ शकते.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स