कोलेस्टेरॉल वाढण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. हा चिकट पदार्थ नसांमध्ये जमा होतो आणि याचे प्रमाण वाढल्यानंतर ब्लॉकेज व्हायला सुरूवात होते. यामुळे ब्लड फ्लो संथगतीनं होतो. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. जीवघेणे आजार टाळण्यासाठी व्हेजिटेरियन आणि व्हेगन डाएटचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. (How to lower bad cholesterol)
युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की व्हेजिटेयन आणि वेगन डाएटने कोलेस्टेरॉल लेव्हल कमी होण्यास मदत होते. रिपोर्ट्सनुसार संशोधकांनी १९८२ आणि २०२२ मध्ये वेगवेगळ्या देशातील २,३७२ लोकांवर संशोधन केलं. यातून असं समोर आलं की व्हेजिटेरियन आणि व्हेगन डाएटनं LDL कोलेस्ट्रॉल आणि एपोलिपोप्रोटीन बी कमी होऊ शकतं.
व्हेजिटेरियन डाएटनं कोलेस्टेरॉल कमी होतं?
संशोधकांच्यामते प्लांट बेस्ड डाएटमध्ये एथेरोजेनिक लिपोप्रोटीन असते. यामुळे हृदयरोगाची जोखिम कमी होते. संशोधकांनी टिसी, एलडिएलजसी, टिजी आणि एपीओबी ब्लड लेव्हल वर व्हेजिटेरियन आणि वेगन डाएटच्या प्रभावावर अधिक माहिती घेतली.
अभ्यासादरम्यान, सहभागींचे एलडीएल, किंवा कमी-घनतेचे लिपोप्रोटीन, ज्याला बॅड कोलेस्टेरॉल असेही म्हणतात, त्यांच्या पातळीचे परीक्षण केले गेले. त्यांना आढळले की वनस्पती-आधारित आहाराचे पालन करणाऱ्यांमध्ये एलडीएलची पातळी 10% कमी झाली आहे. एकूण कोलेस्ट्रॉलमध्ये 7% घट झाल्याचेही त्यांना आढळले.
प्लांट बेस्ड डाएटबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही तुमच्या आहारात फायबर्सयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. फायबर्स आणि पचन तंत्राच्या कोलेस्टेरॉलला बांधतात आणि रक्त प्रवाहात येण्याआधीच शरीरच्या बाहेर काढतात. म्हणूनच आहारात ओट्स, जवस, बीन्स, भेंडी, नट्स, वनस्पती तेल, हंगामी फळं, सोया उत्पादनं याचा पदार्थांचा समावेश करू शकता.
ओट्समध्ये बीटा ग्लूकेन्स असतात. हे एक प्रकारचे फायबस असते. जे कोलेस्टेरॉल लेव्हल कमी करण्यास फायदेशीर ठरते. सकाळच्या नाश्त्याला ओट्सचे सेवन करायला हवं. ओट्स खाताना साखर आणि मिठाचा वापर जास्त करू नये.
रोज तुटून केस विरळ झालेत? १ कांदा अन् ४ कडूलिंबाची पानं घ्या; ३० दिवसांत केसांची वाढ होईल
डाळ हा प्रत्येक भारतीय घरातील मुख्य अन्नाचा एक भाग आहे. डाळ केवळ स्वादिष्टच नाही तर शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. कडधान्ये नियमित खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. कडधान्यांमध्ये कमी चरबी आणि जास्त फायबर आणि प्रथिने आढळतात.