Join us  

वाढत्या वजनापुढे हतबल आहात? रात्री झोपताना कोमट पाण्यात ‘हा’ चिमूटभर पदार्थ घालून प्या, फॅट्स होतील गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2023 4:25 PM

How to make cinnamon tea to lose weight : डाएट-व्यायाम करुनही वजन वाढतच असेल, त्वचा निस्तेज दिसत असेल तर हा उपाय करा

वजन कमी (Weight loss) करणं हे खरंच खायचं काम नाही. प्रत्येक जण  वेट लॉस करण्याकडे एक टास्क म्हणून पाहतात. वेट लॉस करण्याच्या अनेक उपाय आहेत. प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे. काहींचे वजन व्यायाम शाळेत जाऊन कमी होते. तर, काहींचे वजन डाएट आणि योगासना करून कमी होते.

आपण कितीही व्यायाम शाळेत जाऊन घाम गाळला तरी, डाएटकडे विशेष लक्ष द्यायला हवे. काही लोकं सकाळी किंवा रात्रीच्या वेळेस वेट लॉस ड्रिंक पिऊन वजन कमी करतात. वेट लॉस ड्रिंक वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. आपल्याला जर वजन कमी करायचं असेल तर, कोमट पाण्यात दालचिनी पावडर घालून प्या(How to make cinnamon tea to lose weight).

वजन कमी करायचं? मग खा सिमला मिरची! - वजन कमी करण्याचा एकदम सोपा आणि असरदार इलाज

यासंदर्भात, फिटनेस कोच, न्यूट्रिशनिस्ट आणि सप्लिमेंट्स स्पेशालिस्ट विनीत कुमार सांगतात, 'दालचिनीचे पाणी प्यायल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते. मुख्य म्हणजे हे ड्रिंक महिलांसाठी फायदेशीर ठरते. हार्मोनल समस्यांमुळे अनकेदा वजन वाढते. जर नियमित आपण हे ड्रिंक पीत असाल तर, नक्कीच वजन कमी होईल. यासह यामध्ये अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे इतर इन्फेक्शनचा त्रास होत नाही.'

फक्त ५ मिनिटं रोज घरात एकच व्यायाम करा, पोट-कंबर-पाय सगळीकडची चरबी होईल झटपट कमी

या पद्धतीने तयार करा दालचिनीचे पाणी

वेट लॉस ड्रिंक म्हणजेच दालचिनीचे पाणी तयार करण्यासाठी, एका भांड्यात दीड कप पाणी घ्या. त्यात एक दालचिनीचा तुकडा किंवा दालचिनी पावडर घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मध्यम आचेवर ठेवा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. पाणी गाळणीच्या मदतीने एका ग्लासमध्ये गाळून घ्या. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात एक किंवा अर्धा चमचा मध घालून मिक्स करा. हे वेट लॉस ड्रिंक झोपण्यापूर्वी प्या. यामुळे मेटाबॉलिज्म बुस्ट होईल. शिवाय वजन कमी करण्यास मदत मिळेल. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स