नाश्त्याला दूधासोबत एक लाडू खाण्याचा सल्ला दिला जातो. खासकरून थंडीच्या दिवसांत लाडू खाणं तब्येतीसाठी उत्तम मानलं जातं. हिवाळ्याच्या दिवसांत ड्राय फ्रुटसचे लाडू, डिंकाचे लाडू, आळशीचे लाडू, मेथीचे लाडू खाल्ले जातात.(How To Make Methi Sunth Laddu Recipe Eat One Laddu In Breakfast) हे लाडू खाल्ल्यानं शरीराला ताकद मिळते आणि शारीरिक वेदनाही कमी होतात. मेथी आणि सुंठाचे लाडू खाल्ल्यानं सांधेदुखीच्या वेदना दूर होतात. हे लाडू शरीराला गरम ठेवतात मेथी आणि सुंठाचे लाडू कसे बनवावेत पाहूया. (How To Make Methi Sunth Laddu Recipe)
मेडीको पब्लिकेशन्सच्या एका रिपोर्टनुसार इंटरनॅशनल जर्नल ऑफ नर्सिंग केअरच्या तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासात दिसून आले की मेथीच्या सेवनानं गुडघेदुखी, सांधेदुखीच्या वेदनांपासून आराम मिळतो. 2011 मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात गुडघ्याच्या सांध्यावर मेथीच्या दाण्यांची पेस्ट लावण्यात आली होती (Ref). या संशोधनाच्या निष्कर्षानुसार बहूसंख्य लोक वयोवृद्ध आहेत. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास होतो. मेथीचे दाणे गुडघेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात.
सुंठाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य
1) मेथीचे दाणे - 3 कप ( दुधात भिजवून ठेवा)
2) गुळ - 500 ग्राम
3) बेसन - 1 कप
4) गव्हाचं पीठ - 1 कप
5) डिंक - अर्धा कप
6) सुंठ- 2 टिस्पून
7) काजू - अर्धा कप
8) अक्रोड- अर्धा कप
9) बदाम- अर्धा कप
10) वेलची- 6 ते 7
सुंठ-मेथीचे लाडू करण्याची सोपी रेसिपी (How To Make Sunth Methi Ladoo)
सगळ्यात आधी मेथीचे दाणे व्यवस्थित धुवून घ्या. नंतर मेथी 2 कप दूधात व्यवस्थित भिजवा तुम्ही मेथी आधी वाटून नतंर दुधात भिजवायला ठेवू शकता. मेथीचे अख्खे दाणे भिजवायला ठेवले असतील मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या.
एका कढईत तूप घाला आणि त्यात बदाम घालून व्यवस्थित भाजून घ्या. गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवून नंतर बदाम भाजून घ्या, बदाम भाजल्यानंतर तुपात काजू, अक्रोड भाजून घ्या. मंच आचेवर डिंक भाजून घ्या. डिंक आतूनही व्यवस्थित भाजून होईल असे पाहा जेणेकरून खाताना चिकट वाटणार नाही.
तळलेलं तेल ‘या’ पद्धतीने साफ करा, मात्र तज्ज्ञ सांगतात तळलेलं तेल पुन्हा वापरलं तर..
उरलेल्या तुपात मेथी घाला. तूप थोडं कमी होऊ लागेल तेव्हा परत तूप घाला आणि मेथी परत भाजून घ्या. मेथी भाजल्यानंतर तुप सोडू लागेल. नंतर सुंठ पावडर घालून मेथी अजून थोडी भाजून घ्या. मेथी एका ताटात काढून नंतर कढईमध्ये पीठ आणि बेसन मिसळून भाजून घ्या. यात उरलेलं तूपही घाला. तूप कमी झालं तर त्यात 1 ते 2 चमचे अजून तूप मिसळा. पीठ गोल्डन होईपर्यंत भाजा नंतर काढून घ्या.
कढईमध्ये 1 चमचा तूप घाला नंतर त्यात गुळ घाला. गुळ वितळल्यानंतर 1 चमचा पाणी घाला नंतर वितळण्याची वाट पाहा. सर्व ड्रायफ्रुट्स मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या. डिंक कोणत्याही एका वाटीनं हलकं दाबून क्रश करून घ्या आणि थोडं मोठं ठेवा.
दिवाळीत विकल्या जाणाऱ्या बनावट बदामांमुळे होऊ शकतो कॅन्सर; 5 सेकंदात अशी ओळखा बदामाची शुद्धता
गुळ जास्त शिजवू नका. गुड वितळला की लगेच गॅस बंद करा. हे सर्व पदार्थ गुळात मिक्स करून ठेवा हलकं थंड झाल्यानंतर हातानं सर्व पदार्थ एकत्र करा आणि लाडू बनवून घ्या. तयार आहेत मेथी आणि सुंठाचे लाडू. तुम्ही हे लाडू रोज खाऊ शकता 1 लाडू रोज दुधासोबत खाल्ल्यानं शरीरातील वेदना दूर होतील.