Join us  

कशाने येतो बायकांना प्रचंड स्ट्रेस, सतत चिडचिड - डोळ्यात पाणी? 5 उपाय - व्हा स्ट्रेस फ्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2023 5:19 PM

How To Manage Stress Tips For Women : मनावर सतत दडपण येत असेल तर करायलाच हव्यात ५ गोष्टी...जगाल आनंदी...

थोडं काही झालं की आलंच डोळ्यात पाणी. सतत दडपण, ताण यांमुळे मनावर नकळत एकप्रकारचं ओझं येतं. महिलांना अगदी लहानसहान गोष्टीचाही खूप ताण येतो. कधी कौटुंबिक समस्या, कधी कामाचा ताण तर कधी ऑफीसमधल्या गोष्टींचे प्रेशर यांमुळे महिलांना एकाएकी खूप ट्रेसफुल वाटतं. या ताणाचा महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परीणाम होतो. २०२२ मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतीय महिलांमध्ये इतर देशातील महिलांच्या तुलनेत ताणाचे प्रमाण जास्त आहे. याची काही महत्त्वाची कारणे नोंदवण्यात आली आहेत. हार्मोन्समध्ये होणारे चढउतार आणि त्यामुळे महिलांचे सतत होणारे मूड स्विंग यांमुळे हा ताण वाढत असल्याचे दिसते. वयात येणे, पाळी सुरू होणे, शारीरिक संबंध, गर्भधारणा, त्यानंतर येणारी निराशा, मेनोपॉज यांसारख्या शारीरिक बदलांमुळे महिलांना ताण जास्त प्रमाणात येतो. पण काही गोष्टी नियमितपणे केल्यास महिला आपला हा ताण कमी करु शकतात. या गोष्टी कोणत्या ते पाहूया (How To Manage Stress Tips For Women)...

१. नियमित व्यायाम

ताण घालवण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे हा सर्वात उत्तम उपाय आहे. शारीरिक हालचाल झाली की शरीरात एन्डोर्फिन हार्मोन्सची निर्मिती होते. त्यामुळे मेंदूमध्ये आनंद देणाऱ्या भावना निर्माण होतात. तसेच व्यायाम केल्याने चांगली झोप येते, एनर्जी लेव्हल सुधारते आणि मूडही चांगला होतो. 

२. मेडीटेशन

आपल्याला सतत लहानसहान गोष्टीचा ताण येत असेल तर मेडीटेशन करणे हा त्यावरील एक उत्तम उपाय आहे. यामुळे ताण, भिती या गोष्टी नकळत कमी होतात आणि आपल्याला रिलॅक्स वाटण्यास मदत होते. 

३. पुरेशी झोप घ्या

झोप ही आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. पण महिलांना अनेकदा लहान मुले, घरातील काम, इतर ताणतणाव यामुळे पुरेशी झोप मिळत नाही. पण रात्रीच्या वेळी किमान ७ ते ८ तासांची झोप मिळाली तर आपल्याला आलेला ताण कमी होण्यास याची निश्चितच चांगली मदत होते.

(Image : Google)

४. कनेक्ट 

आपण घर, संसार, ऑफीस या गोष्टींमध्ये इतके अडकून जातो की आपला बाहेरच्या जगाशी असणारा कनेक्ट हळूहळू कमी होत जातो. पण मित्रमंडळी, नातेवाईक यांना थोडा वेळ दिला आणि काही सोशल अॅक्टीव्हिटीजमध्ये किंवा आपल्या छंदांसाठी वेळ दिला तर आपला मनावरचा ताण नक्कीच कमी होऊ शकतो. 

५. दिवसातून ठराविक ब्रेक घ्या  

ताण मॅनेज करायचा असेल तर दिवसभराच्या कामातून ठराविक वेळ ब्रेक घेणे अतिशय महत्त्वाचे असते. काम करताना ब्रेक घेऊन थोडे स्ट्रेचिंग करणे, चालणे किंवा नुसता वेळ घालवणे यामुळेही आपला ताण कमी होण्यास निश्चितच मदत होते.   

टॅग्स :फिटनेस टिप्समानसिक आरोग्य