Lokmat Sakhi >Fitness > नेहमी गाडी लागते, उलट्या-मळमळतं? २ सोपे उपाय, प्रवासात गाडी लागणं बंद-आनंदानं जा फिरायला!

नेहमी गाडी लागते, उलट्या-मळमळतं? २ सोपे उपाय, प्रवासात गाडी लागणं बंद-आनंदानं जा फिरायला!

Motion Sickness Yoga Mudra : Mudra for travel sickness : Motion Sickness Remedy : How to prevent motion sickness with yoga: प्रवासादरम्यान होणाऱ्या उलटी, मळमळ, डोके व पोटदुखीचा त्रास अगदी मिनिटभरातच थांबून आराम मिळतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2025 17:29 IST2025-03-31T17:24:04+5:302025-03-31T17:29:43+5:30

Motion Sickness Yoga Mudra : Mudra for travel sickness : Motion Sickness Remedy : How to prevent motion sickness with yoga: प्रवासादरम्यान होणाऱ्या उलटी, मळमळ, डोके व पोटदुखीचा त्रास अगदी मिनिटभरातच थांबून आराम मिळतो.

How to prevent motion sickness with yoga Motion Sickness Yoga Mudra Mudra for travel sickness | नेहमी गाडी लागते, उलट्या-मळमळतं? २ सोपे उपाय, प्रवासात गाडी लागणं बंद-आनंदानं जा फिरायला!

नेहमी गाडी लागते, उलट्या-मळमळतं? २ सोपे उपाय, प्रवासात गाडी लागणं बंद-आनंदानं जा फिरायला!

आत्तापर्यंत मुलांच्या परीक्षा संपून सगळ्यांना उन्हाळ्याची सुट्टी पडलीच असेल. बहुतेकवेळा उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक घरांमध्ये बाहेर किंवा गावी फिरायला जायचे प्लॅनिंग केले जाते. या प्लॅनिंगनुसार (Mudra for travel sickness) आपण सगळेच वर्षातून एकदा तरी घराबाहेर पडून फिरायला जातो. प्रवासादरम्यान आपल्यापैकी (Motion Sickness Yoga Mudra) काहीजणांना उलटी, मळमळ होण्याची समस्या सतावते. या समस्येमुळे आपण काहीवेळा घराबाहेर फिरायला जाणे टाळतो(How to prevent motion sickness with yoga).

प्रवासादरम्यान अशी वारंवार उलटी होऊन, डोकं जड होते, मळमळ झाल्यासारखे वाटते, ही समस्या छोटोशी वाटली तरी संपूर्ण प्रवासांत त्रासदायकच ठरते. अशावेळी प्रवासाचा त्रास होऊन अशी उलटी होऊच नये यासाठी अनेक गोळ्या, औषध घेतली जातात. परंतु काहीवेळा ही गोळ्या, औषध घेऊन देखील काहीच उपाय होत नाही. मग अशावेळी ही मळमळ, उलटी आणि डोकेदुखी नेमकी थांबवायची तरी कशी असा प्रश्न पडतो. इतकेच नव्हे तर प्रवासांत असताना आपण लगेच उठून डॉक्टरकडे देखील जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत, आपण एक खास उपाय करुन पाहू शकतो. हा खास आयुर्वेदिक उपाय केल्याने प्रवासादरम्यान होणाऱ्या उलटी, मळमळ, डोके व पोटदुखीचा त्रास अगदी मिनिटभरातच थांबून आराम मिळतो. यामुळे आपला पुढील प्रवास अगदी सुखकर होतो. 

प्रवासादरम्यान उलटी, मळमळ, डोकेदुखी होऊ नये म्हणून... 

१. ऍक्युप्रेशर पॉईंट मसाज :- आपल्या उजव्या हाताची पहिली तीन बोट आपल्या डाव्या हाताच्या मनगटापासून खाली तीन बोटांइतके अंतर सोडून जो ऍक्युप्रेशर पॉईंट असतो त्या भागावर हलकेच दाब देत मसाज करावा. तुम्ही २ ते ३ मिनिटे मसाज करु शकता. या उपायामुळे प्रवासादरम्यान उलटी, मळमळ, डोकेदुखीची समस्या कमी होण्यास मदत होईल. 

विराट कोहलीच्या पोषणतज्ज्ञांनी सांगितली खास युक्ती, ४ सवयी फक्त बदला-फिटनेस मिळवा कोहलीसारखा!

२.शून्य मुद्रा :- ऍक्युप्रेशर पॉईंट मसाज सोबतच आपण हातांची शून्य मुद्रा देखील करु शकतो. यासाठी आपल्या हातांच्या सगळ्यात मधले बोट दुमडून मग त्यावर अंगठ्याने हलकेच दाब देत याच स्थितीत ५ ते १० मिनिटे डोळे बंद करुन शांत बसावे. यामुळे उलटी, मळमळ, डोकेदुखीची समस्या कमी होण्यास मदत होईल.

वाढते वजन - पोटाची ढेरी होईल कमी, सकाळी उपाशी पोटी खा 'हे' फळं - दिसाल स्लिमट्रिम...

यासोबतच इतरही गोष्टी लक्षात ठेवा... 

१. प्रवास करताना किंवा त्यापूर्वी तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. जेवल्यानंतर लगेच गाडीतून प्रवास करू नये. जेवण करण्यापूर्वी आणि जेवणानंतर काही काळ थांबावे. हलके अन्न खाल्ल्याने उलट्यांचा धोका कमी होतो.

२. कारमध्ये बसल्यावर एसीऐवजी खिडकी उघडी ठेवून फ्रेश हवा घ्या. तसेच मागे बसण्याऐवजी पुढच्या सीटवर बसले तर बरे होईल.


उन्हाळ्यांत आहारामध्ये करा 'हे' ५ बदल, अपचन - डिहायड्रेशन होणार नाही - उन्हाळा जाईल सुखकर...

३. सकाळी प्रवास करायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे, धणे आणि बडीशेप भिजवा आणि सकाळी ते पाणी प्या. यामुळे प्रवासात उलट्या होणार नाहीत.     

४. प्रवासात डोकेदुखी आणि उलटीचा त्रास होत असेल तर प्रवासाला निघताना तोंडात एक लहान आल्याचा तुकडा ठेवा, यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. आल्याऐवजी तुम्ही आलेपाक किंवा आल्याची वडीही खाऊ शकता.


Web Title: How to prevent motion sickness with yoga Motion Sickness Yoga Mudra Mudra for travel sickness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.