Join us  

दररोज करा बालासन, रोज छळणारी पाठदुखी होईल गायब, शरीर आणि मन दोन्ही होईल रिलॅक्स..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2022 6:21 PM

Yoga For Relaxing Mind and Body: मन आणि शरीर दोन्हीही रिलॅक्स करण्यासाठी हा व्यायाम अतिशय चांगला आहे. दररोज दिवसातून एखादा मिनिट हा व्यायाम करून बघा.

ठळक मुद्देपोटाच्या आतील अवयवांचा व्यायाम होतो आणि त्यामुळे पचन, चयापचय या क्रिया अधिक चांगल्या होतात.संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी उपयुक्त आसन. 

डॉ. अंबिका याडकीकर, फिजिओथेरपीस्टदिवसभर काम करून करून पाठ- कंबर आखडून जाते. अंग जड पडतं. शिवाय दिवसभराच्या कामाने मन आणि शरीर दोन्हीही थकून जाते. अशावेळी मन शांत करण्यासाठी, शरीराला आलेला थकवा घालविण्यासाठी बालासन ( Benefits of Balasan) करणे अतिशय उपयुक्त ठरते. हे एक अगदी सोपे आसन असून सहज जमण्यासारखे आहे. या व्यतिरिक्तही बालासन करण्याचे इतर अनेक फायदे आहेत. मुल गर्भात असताना याच अवस्थेत असते, त्यामुळे या आसनाला बालासन असे नाव देण्यात आले आहे.(Perfect yoga for reducing back pain)

 

कसे करायचे बालासन?१. बालासन करण्यासाठी सगळ्यात आधी वज्रासनाची अवस्था घेऊन योगा मॅटवर किंवा सतरंजीवर बसा.

२. त्यानंतर पायाचे तळवे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करा.

नवरात्र स्पेशल पदार्थ: खूप अशक्तपणा वाटतो? अंगात ताकदच नाही? खा सातूचे पीठ- फायदे ५

३. गुडघे शक्य होतील तेवढे एकमेकांपासून दूर करा.

४. आता कंबरेतून खाली वाका आणि दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये तुमचे पोट, छाती असेल, अशा पद्धतीने शरीराची अवस्था घ्या.

५. डोके खाली जमिनीवर टेकवा आणि हात समोरच्या बाजूने सरळ रेषेत पसरवा.

 

बालासन करण्याचे फायदे१. बालासन केल्यामुळे मनाला शरीराला विश्रांती मिळते. त्यामुळे बऱ्याचदा वर्कआऊट झाल्यानंतर हे आसन केले जाते. वर्कआऊटमुळे आलेला थकवा घालविण्यासाठी हे आसन फायदेशीर ठरते.

२. मांड्या, पोटऱ्या यांच्यावर ताण येऊन तेथील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी उपयुक्त आसन.

नवरात्र स्पेशल: देवीसाठी तांबुल करायचा? २ सोप्या रेसिपी, तांबुलही रंगेल छान..

३. हे आसन नियमित केल्यास पाठ आणि कंबरेचे स्नायू मोकळे होतात. त्यामुळे पाठदुखी, कंबरदुखी कमी होते. त्यांच्यात लवचिकता येते.

४. पाठीच्या कण्याला किंवा मणक्याला रिलॅक्स करण्यासाठी उपयुक्त आसन.

५. बालासन केल्याने मन शांत होते.

नवरात्री स्पेशल: करा उपवासाचा कुरकुरीत मसाला डोसा, शेफ कुणाल कपूर यांची चविष्ट- सोपी रेसिपी

६. पोटाच्या आतील अवयवांचा व्यायाम होतो आणि त्यामुळे पचन, चयापचय या क्रिया अधिक चांगल्या होतात.

७. संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी उपयुक्त आसन.  

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामयोगासने प्रकार व फायदेहेल्थ टिप्स