Lokmat Sakhi >Fitness > ओटी पोट-मांड्यांचा घेर वाढला? झोपण्याच्या ५ मिनिटं आधी १ काम करा; झरझर कमी होईल चरबी

ओटी पोट-मांड्यांचा घेर वाढला? झोपण्याच्या ५ मिनिटं आधी १ काम करा; झरझर कमी होईल चरबी

How to Reduce Belly Faster : हे व्यायाम प्रकार कोणते आणि कसे करावेत ते पाहूया. (Easy Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life)

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 11:40 AM2023-10-17T11:40:10+5:302023-10-17T11:40:55+5:30

How to Reduce Belly Faster : हे व्यायाम प्रकार कोणते आणि कसे करावेत ते पाहूया. (Easy Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life)

How to Reduce Belly Faster : Easy Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life | ओटी पोट-मांड्यांचा घेर वाढला? झोपण्याच्या ५ मिनिटं आधी १ काम करा; झरझर कमी होईल चरबी

ओटी पोट-मांड्यांचा घेर वाढला? झोपण्याच्या ५ मिनिटं आधी १ काम करा; झरझर कमी होईल चरबी

अनेकदा व्यक्तीचे शरीर लठ्ठ नसते पण पोट बाहेर आलेलं दिसून येतं. व्यायामाला पुरेसा वेळ मिळत नसल्यामुळे वजन लवकर कमी होत नाही. (How to loss belly fat) बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही काही सोपे व्यायाम प्रकार करू शकता. रात्रीच्यावेळी हे व्यायाम केल्यास याचा पोटावर चांगला परिणाम दिसून येईल आणि बेली फॅट कमी होण्यास मदत होईल. हे व्यायाम प्रकार कोणते आणि कसे करावेत ते पाहूया. ( Easy Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life)

1) नी पुशअप्स

अनेकांना पुशअप्स करणं कठीण वाटतं. यामुळे तुम्ही नी-पुशअप्स करू शकता. रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही नी पुशअप्स करू शकता. नी पुशअप्स करताना सगळ्यात आधी गुडघ्यावर खाली बसा. नंतर दोन्ही हातांना समोर जमिनीवर ठेवा. नंतर कोपरापासून हात वाकवून पुन्हा वर घ्या.  यानंतर सामान्य पुशअप्स करताना  पायाचे पंजे जमिनीवर टेकवा.

2) स्क्वॅट्स

बेली फॅट कमी करण्यासाठी स्क्वॅट्स हा उत्तम व्यायाम आहे. जसं तुम्ही लहानपणी उशाबशा करायच्यात तसंच स्क्वॅट्स करा.  गुडघ्यांमध्ये वाकून खाली बसा.  या व्यायामासाठी एकदम खाली वाकायच्या काही गरज नाही. रोज  ४ मिनिटं व्यायाम केल्यानंतर तुम्हाला बेली फॅट कमी झालेलं दिसून येईल. या उपायाने शरीर योग्य आकारात येईल.

3) बेड सिट अप्स

झोपण्याच्याआधी पलंगाच्या बाजूला उभं राहा. नंतर बेडवर बसा आणि पुन्हा उभं राहा. ५ मिनिटांत कमीत कमी  ३० ते ४० वेळा हा व्यायाम करा. यामुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होईल. तुम्ही सिट अप्स जास्तवेळही करू शकता.  पण खाल्ल्यानंतर व्यायाम करणं टाळा. 

पोटाची चरबी कशी कमी करावी? 

१) वजन कमी करण्यासाठी वॉक करू शकता. वॉकिंगमुळे फॅट कमी होण्यास मदत होते. रोज चालल्याने शरीर योग्य आकारात येऊ लागते. शरीर इंचेसमध्ये कमी होते. तुम्ही पार्कमध्ये किंवा घरच्याघरी वॉक करू शकता. 

नवरात्राच्या ९ दिवसात भराभर घटेल पोटाची चरबी; फराळाचे हे पदार्थ खा-फिगर दिसेल मेंटेन

२) कोमट पाणी प्यायल्याने पोटावर सकारात्मक परिणाम होतो . पाणी कसं आणि कोणत्यावेळी प्यायचं हे खूप कमी लोकांना माहीत असतं. २० मिनिटांनी तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता. (Lukewarm Water) या उपायाने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. 

वाटीभर साबुदाण्याचे ५ मिनिटांत करा खमंग अप्पे, उपवासाची सोपी-खमंग रेसिपी, नक्की ट्राय करा

३) दिवसभरात कमीत कमी एक तरी सिजनल फ्रुट खा. सफरचंद, पेरू, पिअर खाऊ शकता. फळं फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे. फळं सकाळी ११ वाजच्या दरम्यान खा किंवा दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान तुम्ही खाऊ शकता. 
 

Web Title: How to Reduce Belly Faster : Easy Ways to Lose Belly Fat and Live a Healthier Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.