पोटावरची चरबी ही अनेक लाेकांची डोकेदुखी झाली आहे. काही केल्या पोट उतरतच नाही, असं अनेकांचं म्हणणं आहे. बऱ्याच महिलांच्या बाबतीत तर असंही दिसून येतं की बाकीचं शरीर व्यवस्थित प्रमाणात असतं. पण पोट मात्र त्यामानाने पुढे आलेलं, सुटलेलं दिसतं (How to reduce belly fat? ). पोटाचा आकार बिघडला की मग शरीरही बेढब दिसू लागतं. म्हणूनच फिटनेस जपत पोटावरची चरबी कमी करायची असेल तर हे काही व्यायाम नियमितपणे करा.(Just 10 minutes exercise for toned belly)
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी व्यायामहे व्यायामप्रकार इन्स्टाग्रामच्या theyoginiworld या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये सांगितलेले दोन्ही व्यायाम भिंतीचा आधार घेऊन करायचे आहेत.
पाणी वाहून जात नसल्याने सिंक तुंबलेय? २ घरगुती उपाय, पाण्याचा होईल चटकन निचरा१. पहिला व्यायाम करण्यासाठी दोन्ही तळहात भिंतीवर टेकवा आणि भिंतीकडे चेहरा करून उभे रहा. साधारणपणे तुमच्या छातीच्या समांतर तुमचे तळहात भिंतीवर ठेवावेत. यानंतर एक- एक पाय गुडघ्यात वाकवावा आणि वर उचलावा. पोटाच्या उंचीपर्यंत तरी पाय वर उचलता यायला पाहिजे. हा व्यायाम ५ मिनिटे करावा.
२. दुसऱ्या व्यायाम प्रकारातही तुम्हाला आधीच्या स्थितीतच उभे रहायचे आहे. आता फक्त पाय तिरक्या रेषेत वर उचलायचे आहेत. म्हणजेच उजवा पाय वर उचला आणि त्याचा गुडघा डाव्या हाताला लावण्याचा प्रयत्न करा. असंच डाव्या पायानेही करावे.
हे देखील लक्षात घ्या...पोटावरची चरबी कमी करण्यासाठी फक्त व्यायाम करणे, एवढाच उपाय नाही. यासाठी तुमचा आहार आणि तुमची बाकीची दिनचर्या कशी आहे, हे बघणे देखील महत्त्वाचे ठरते.
फक्त १० रुपयात टॅन झालेली, काळवंडलेली त्वचा होईल स्वच्छ उजळ.. करून बघा १ सोपा उपाय
त्यामुळे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असेही सांगितलेले आहे की पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम तर कराच, पण त्यासोबत ४५ मिनिटांचे वर्कआऊट, रोजचे वॉकिंग, योगा असेही करायला हवे. तसेच आहारात फायबर जास्त असलेले पदार्थ घ्यायला पाहिजेत.