बॉलीवूडमध्ये आपल्या तब्येतीच्या बाबतीत, फिटनेसच्या बाबतीत अतिशय काटेकोर आणि जागरुक असणाऱ्या ज्या कोणत्या अभिनेत्री आहेत, त्यामध्ये एक अग्रेसर असणारं नाव म्हणजे करिना कपूर. बॉलीवूडमध्ये झीरो फिगरचा ट्रेण्ड आणणारी करिना पहिलीच आहे. तसेच दोन मुलांच्या जन्मानंतर झटकन वेटलॉसकरून पुन्हा करिअर नव्या जोमात रिस्टार्ट करणारी करिना अनेकींची आदर्श आहे. करिनाच्या व्यायामातल्या सातत्याचं तिच्या फिटनेस ट्रेनर म्हणजेच अंशुका परवानी या नेहमीच कौतूक करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी करिनाचं कौतूक केलं असून करिनाचा चक्रासन करतानाचा फोटो त्यांनी साेशल मिडियावर शेअर केला आहे. (Kareena Kapoor suggest exercise for reducing belly fat)
कसं करायचं चक्रासन?
अंशुका परवानी यांनी करिनाचा जो फोटो शेअर केला आहे, त्यात करिना कपूर चक्रासन करताना दिसत आहे. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम अतिशय उपयुक्त आहे. एवढंच नाही तर चक्रासन करण्याचे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक फायदे आहेत.
चक्रासन करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झोपा. यानंतर पाय गुडघ्यात वाकवा आणि हात कोपऱ्यात वाकवून तळहात जमिनीवर टेकवा. आता हळूहळू डोके, मान, छाती, पोट, मांड्या असं सगळं शरीर उचला आणि संपूर्ण शरीराचा भार दोन्ही तळहात आणि तळपायांवर तोलून धरण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला लगेचच हे आसन जमणार नाही. पण प्रयत्न केल्यास हळूहळू आसनस्थिती नक्कीच येईल.
चक्रासन करण्याचे फायदे
१. पोटावरची चरबी कमी करण्यासाठी चक्रासन अतिशय उपयुक्त आहे.
२. चक्रासन नियमितपणे केल्यास मासिक पाळीतला त्रास कमी होण्यास नक्कीच मदत होते.
३. बसण्याच्या, उभं राहण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पाठीत बाक आला असेल तर बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी चक्रासन करावे.
४. चक्रासन केल्याने मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो.
५. चक्रासन केल्याने झोप चांगली येते. मन शांत ठेवण्यास मदत हाेते.