Lokmat Sakhi >Fitness > शुगर लेव्हल अन् कॉलेस्टेरॉल नेहमी कंट्रोलमध्ये राहील; रोजच्या जेवणात ‘ही’ १ डाळ हवीच..

शुगर लेव्हल अन् कॉलेस्टेरॉल नेहमी कंट्रोलमध्ये राहील; रोजच्या जेवणात ‘ही’ १ डाळ हवीच..

How To Reduce Cholesterol Diabetes : मुगाची डाळ खाणे आरोग्यदायी मानले जाते कारण त्यात मुबलक प्रमाणात पोषक असतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 02:10 PM2022-08-18T14:10:21+5:302022-08-18T15:27:25+5:30

How To Reduce Cholesterol Diabetes : मुगाची डाळ खाणे आरोग्यदायी मानले जाते कारण त्यात मुबलक प्रमाणात पोषक असतात.

How To Reduce Cholesterol Diabetes : Ayurveda expert shared health benefits of moong dal or moong beans it helps to control diabetes | शुगर लेव्हल अन् कॉलेस्टेरॉल नेहमी कंट्रोलमध्ये राहील; रोजच्या जेवणात ‘ही’ १ डाळ हवीच..

शुगर लेव्हल अन् कॉलेस्टेरॉल नेहमी कंट्रोलमध्ये राहील; रोजच्या जेवणात ‘ही’ १ डाळ हवीच..

डाळी तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहार आहे. डाळी, कडधान्यांचे अनेक प्रकार आहेत – हरभरा डाळ, मसूर डाळ, काळे डाळ, उडीद डाळ, तूर इ. यापैकी एक आहे मूग डाळ. ती सर्वात आरोग्यदायी मानली जाते. आयुर्वेदानेही याचे वर्णन 'डाळींची राणी' असे केले आहे. (Health Tips) मूग डाळीचे दोन प्रकार आहेत - हिरवी मूग डाळ आणि पिवळी मूग डाळ.  (How To Reduce Cholesterol Diabetes)

मुगाची डाळ खाणे आरोग्यदायी मानले जाते कारण त्यात मुबलक प्रमाणात पोषक असतात. फ्लेव्होनॉइड्स, फेनोलिक ऍसिडस्, सेंद्रिय ऍसिडस्, एमिनो ऍसिड, कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. (Ayurveda expert shared health benefits of moong dal or moong beans it helps to control diabetes)

याव्यतिरिक्त, मूग डाळीमध्ये अँटीऑक्सिडेंट, अँटीमाइक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीडायबेटिक, अँटीहाइपरटेन्सिव्ह गुणधर्म असतात.  जे अनेक आजारांवर उपचार करण्यास उपयुक्त ठरू शकते. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी नुकतीच मूग डाळ खाण्याची पद्धत आणि त्याचे सेवन करण्याचे फायदे इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मूग डाळ हे सुपरफूड असल्याचे त्या सांगतात.

त्यात असलेल्या पोषक तत्वांमुळे, आयुर्वेदामध्ये डाळी नियमितपणे खाण्याची शिफारस केली जाते. शिवाय, ते पचायला सर्वात सोपा आणि हलक्या असतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याचा मेंदूवर सात्विक प्रभाव पडतो.

डायबिटीस असल्यास कोणत्या डाळी खायच्या? 

मधुमेहामध्ये मूग डाळ खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरं तर, त्यात अँटीऑक्सिडेंट आणि अँटीडायबेटिक गुणधर्म आहेत. हे गुणधर्म रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्याचे काम करतात. मूग डाळ शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्याचे काम करते.  मूग डाळ फायबर आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे, त्याच्या सेवनाने भूक संप्रेरकांवर परिणाम होतो, जे भूक नियंत्रित करतात. याच्या मदतीने अति खाण्याने होणारा लठ्ठपणा नियंत्रित करता येतो.

शरीरात जळजळ होण्याची समस्या असल्यास मूग डाळीचे सेवन फायदेशीर ठरते. मूगामध्ये आढळणारे पॉलीफेनॉल, जसे की विटेक्सिन, गॅलिक अॅसिड आणि आयसोविटेक्सिन यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे जळजळ आणि वेदनांवर उपचार करण्यास मदत करतात. त्यामुळे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी मूग डाळ खाणे चांगले ठरू शकते.

१) मूग डाळीचा कोलेस्ट्रॉल कमी करणारा प्रभाव असतो. या प्रभावामुळे, मूग डाळ रक्तातील एलडीएल (खराब) कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचे काम करते.

२) मुगाची पावडर आणि फेस पॅक लावल्याने त्वचा चमकदार होते, असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. यासोबतच ही डाळ मुरुम, एक्जिमा आणि खाज यापासून आराम देण्याचे काम करतात.

३) डॉक्टर दीक्षा सांगतात की शिजवण्यापूर्वी मूग भिजवायला विसरू नका. भिजवल्याने त्यातील फायटिक ऍसिड काढून टाकले जाते ज्यामुळे पोषक तत्वांचे पचन आणि शोषण करणे सोपे होते.

Web Title: How To Reduce Cholesterol Diabetes : Ayurveda expert shared health benefits of moong dal or moong beans it helps to control diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.