कामाचं स्वरुप, आवड किंवा वेळ घालविण्याची सोय... अशा अनेक कारणांमुळे हल्ली बहुतांश जणांना स्क्रिनसमोर अधिकाधिक वेळ घालवावा लागतो. कामामुळे तर काही जणांना सतत ८ ते १० तास लॅपटॉपसमोर बसावं लागतं. स्क्रिनचा प्रखर उजेड सतत काही तास पाहिल्याने मग डोळे थकून जातात. त्यांच्यावर ताण येतो (Eye Exercise To Reduce Eye Strain). यामुळे मग डोळे आतल्या बाजुने दुखल्यासारखे वाटणे, चुरचुरणे, लाल होणे, असा त्रास खूप जणांना होतो (How to prevent dryness of eyes). हा त्रास कमी करण्यासाठी योग शिक्षकांनी २ मिनिटांचा (2 minutes eye exercise) एक खास उपाय सुचविला आहे.
डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी उपाय
हा उपाय इन्स्टाग्रामच्या yogawithkamya_ या पेजवर शेअर करण्यात आला आहे. रोज रात्री झोपण्यापुर्वी हा उपाय करावा. हा उपाय करण्यासाठी खूप काही वेगळं करण्याची अजिबातच गरज नाही.
प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला त्रास झालाच, पण कोणाला सांगू शकले नाही, कारण.... आलिया भट सांगतेय...
अगदी अंथरुणात बसल्या बसल्या हा उपाय करू शकता. यासाठी ताठ बसा. दोन्ही हातांची तर्जनी आणि मधले बोट ही दोन्ही बोटे 'V' या आकारात एकमेकांपासून दूर करा आणि ही दोन्ही बोटे डोळ्यांच्या दोन्ही बाजूंना लावा. असे डाव्या हाताने डाव्या डोळ्याला तर उजव्या हाताने उजव्या डोळ्याला करा. यानंतर डोळ्यांच्या पापण्यांची पुढच्या २ मिनिटांसाठी उघडझाप करा.
हा उपाय करण्याचे फायदे
१. डोळ्यांवर आलेला ताण कमी करण्यासाठी फायदेशीर
२. डोळ्यांमध्ये कोरडेपणा कमी करण्यासाठी
कपडे ड्रायरमध्ये खूप वेळ राहिल्याने चुरगळले? बर्फाचा करा खास वापर, आढ्या होतील गायब
३. डोळे रिलॅक्स होऊन त्यांना आराम मिळेल.
४. कमजोर झालेल्या डोळ्यांच्या स्नायूंमध्ये ताकद येण्यासाठी उपयुक्त.
५. एकाग्रता वाढविण्यासाठी चांगला उपाय