Lokmat Sakhi >Fitness > कंबरेच्या दुखण्याने हैराण? आलिया भटच्या फिटनेस ट्रेनर सांगतात ५ व्यायाम, कंबरदुखीवर खात्रीशीर उपाय

कंबरेच्या दुखण्याने हैराण? आलिया भटच्या फिटनेस ट्रेनर सांगतात ५ व्यायाम, कंबरदुखीवर खात्रीशीर उपाय

5 Yogasana For Reducing Lower Back Pain: कंबरदुखीच्या त्रासाने तुम्हीही वैतागला असाल तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) सांगत आहेत ते काही व्यायाम करून पाहा... (5 best exercise for back pain relief)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2024 01:03 PM2024-06-26T13:03:32+5:302024-06-26T13:04:20+5:30

5 Yogasana For Reducing Lower Back Pain: कंबरदुखीच्या त्रासाने तुम्हीही वैतागला असाल तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) सांगत आहेत ते काही व्यायाम करून पाहा... (5 best exercise for back pain relief)

how to reduce lower back pain, anshuka parwani suggests 5 yogasana for reducing lower back pain, 5 best exercise for back pain relief | कंबरेच्या दुखण्याने हैराण? आलिया भटच्या फिटनेस ट्रेनर सांगतात ५ व्यायाम, कंबरदुखीवर खात्रीशीर उपाय

कंबरेच्या दुखण्याने हैराण? आलिया भटच्या फिटनेस ट्रेनर सांगतात ५ व्यायाम, कंबरदुखीवर खात्रीशीर उपाय

Highlightsथोडंसं खाली वाकलं तरी बऱ्याच जणांना कंबर गळून गेल्यासारखं वाटतं. तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर अंशुका परवानी यांनी सांगितलेले काही व्यायाम नियमितपणे करून पाहा.

वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडला की बहुतांश महिलांना कंबरदुखीचा त्रास होतो. बऱ्याच जणींना तर बाळंतपणानंतर हा त्रास सुरू होतो. हल्ली कामामुळे एका जागी जास्त वेळ बसण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. बऱ्याचदा बसण्याची पोझिशन चुकीची असते. त्यामुळे कमी वयातच अनेक जणींना कंबरदुखी छळू लागते. शिवाय हल्ली दुचाकी चालविताना रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांमुळेही कंबरदुखीचा त्रास वाढला आहे. महिलांप्रमाणेच तो आता पुरुषांनाही जाणवू लागला आहे (how to reduce lower back pain?). थोडंसं खाली वाकलं तरी बऱ्याच जणांना कंबर गळून गेल्यासारखं वाटतं. तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर अंशुका परवानी यांनी सांगितलेले काही व्यायाम नियमितपणे करून पाहा. (Anshuka Parwani suggests 5 yogasana for reducing lower back pain)

 

कंबरदुखी कमी करण्यासाठी व्यायाम

१. कंबरदुखीचा त्रास कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावे, याविषयीचा व्हिडिओ अंशुका यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेला पहिला व्यायाम करण्यासाठी गुडघ्यावर उभे राहा. यानंतर दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे घोटे पकडून उष्ट्रासन करा. 

मोठ्या आवाजात टीव्ही पाहणे, गाणी ऐकणे मुलांसाठी घातक, २ आजारांचा धोका, तज्ज्ञ सांगतात... 

२. दुसरा व्यायाम करण्यासाठी गुडघ्यावर उभे राहा. डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडा. त्याचवेळी उजवा हात डोक्यावरून उजव्या बाजुने खाली करा. अशाच पद्धतीने डाव्या हाताने करा. एका नंतर एक याप्रमाणे प्रत्येकी १० वेळा हा व्यायाम करा.

 

३. तिसरा व्यायाम करण्यासाठी मांडी घालून ताठ बसा. दोन्ही तळहात गुडघ्यांवर ठेवा. यानंतर एकदा डाव्या बाजुला तर दुसऱ्यांना उजव्या बाजुला कंबरेतून वळा. दोन्ही बाजुंनी प्रत्येकी १० वेळा हा व्यायाम करा.

डिनर सेटवर पिवळट डाग पडले? १ सोपा उपाय, जुना डिनर सेट होईल नव्यासारखा चकचकीत

४. भुजंगासन करणेही कंबरदुखी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. 

५. भुजंगासन केल्यानंतर बालासन करा. ही आसनस्थिती एक ते दोन मिनिटे टिकवून ठेवा. हे काही व्यायाम नियमितपणे केल्यास कंबरदुखी कमी होईल, असं अंशुका सांगतात. 

 

Web Title: how to reduce lower back pain, anshuka parwani suggests 5 yogasana for reducing lower back pain, 5 best exercise for back pain relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.