मासिक पाळीचे ४ दिवस अनेक जणींना अगदी नकोसे होऊन जातात. कारण या दिवसांत त्यांना खूपच त्रास होत असतो. ओटीपोटात तर खूप दुखतच असते. पण काही जणींची पाठ आणि कंबरही खूप आखडून जाते. बऱ्याच जणींना तर या काळात पोटऱ्यांमध्ये गोळा आल्यासारखे, पाय ओढल्यासारखे वाटते. काही जणींना तर पाळी येण्याच्या ३- ४ दिवस आधीपासूनच हा त्रास सुरू होतो आणि पिरेड्समध्ये तर खूपच वाढतो (How to reduce menstrual pain?). असा त्रास तुम्हालाही होत असेल तर आराम मिळण्यासाठी कोणते ४ व्यायाम करावेत, याविषयी सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी (Anshuka Parwani) यांनी ही खास माहिती सांगितली आहे. हे व्यायाम तुम्ही पाळी सुरू असतानाही करू शकता.(exercise for back pain during periods)
मासिक पाळीतला त्रास कमी करण्यासाठी व्यायाम१. मार्जरासन आणि श्वानासनयालाच आपण इंग्रजीमध्ये cat- dog पोज असं म्हणताे. दोन्ही तळहात आणि गुडघे जमिनीवर टेकवून हा व्यायाम करायचा आहे.
यामध्ये एकदा पाठीचा कणा खालच्या बाजूने वाकवून मान वर करायची, तर दुसऱ्या वेळेस पाठीचा कणा वरच्या बाजुने वाकवून मान खाली झुकवायची. यानंतर पाठीचा कणा वर असताना कंबरेचा भाग गोलाकार फिरवा असंही अंशुका यांनी सांगितलं आहे.
२. बटरफ्लाययामध्ये जमिनीवर बसावे. दोन्ही पाय मांडीपासून ते तळपायापर्यंत पुर्णपणे जमिनीवर टेकलेले असावे.
हृदय ठणठणीत आणि पाठीचा कणा राहील ताठ, करा मलायका अरोरा सांगतेय ते गोमुखासन रोज
दोन्ही तळपाय एकमेकांना जोडलेले असावे. यामुळे कंबर मोकळी होण्यास आणि पायात गोळे येत असतील तर तो त्रास कमी होण्यास मदत होते.
३. मलासनयामध्ये दोन्ही तळपाय जमिनीला टेकवून उकड बसावे. दोन्ही तळहात एकमेकांना जोडून छातीजवळ ठेवावे आणि हातांचे कोपरे दोन्ही मांड्यांना आतल्या बाजूने लावावेत.
४. लेग अप पोजया अवस्थेमध्ये जमिनीवर भिंतीला टेकून पाठीवर झोपावे. दोन्ही पाय जमिनीला टेकवून सरळ वर करावेत.
एखादा मिनिट या अवस्थेत रहावे. पोटदुखी, कंबरदुखी, पाठदुखी आणि पायदुखी असा सगळाच त्रास कमी होईल.