योगशास्त्रामध्ये प्रत्येक अवयवासाठी काही ठराविक योगा आहेत. हातासाठी वेगळे, पाठीसाठी, पोटासाठी वेगळे... तसेच काही योगासनं ही खास पायांसाठी आहेत. पायांची ताकद वाढावी किंवा पायावरील चरबी कमी व्हावी, यासाठी ही योगासनं करायची असतात. म्हणूनच पायांवरची, मांंड्यावरची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी कोणती योगासनं आहेत आणि ती कशी करायची, ते आपण पाहूया.. बऱ्याचदा पायावर चरबीचे खूप थर दिसत असतील तर शॉर्ट कपडे घालायला नकोसं होतं. म्हणूनच ही काही योगासनं नियमित करा (3 Best yoga poses for reducing thigh fat) म्हणजे तुमचेही पाय छान टोन्ड होतील.(exercise for toned leg)
पाय- मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी योगासनं
१. उत्कटासन (chair pose)
उत्कटासन केल्यामुळे पायांवरची चरबी तर कमी होतेच पण गुडघ्यांची आणि पायांची ताकदही वाढते. हे आसन केल्यामुळे विशेषत: मांड्या आणि पोटऱ्या या भागावरची चरबी कमी होण्यास मदत होते.
पावसाळी हवेत बिस्किटे सादळली? झटपट करा चविष्ट बिस्कीट बर्फी, जेवणात खास स्वीट डिश
हे आसन करण्यासाठी दोन्ही हात सरळ वर करा किंवा मग समोरच्या बाजुने सरळ ठेवा. यानंतर पाय गुडघ्यातून वाकवा आणि खुर्चीवर बसल्याप्रमाणे पोझिशन घ्या. ही अवस्था ३० ते ३५ सेकंद टिकवा.
२. उष्ट्रासन (camel pose)
उष्टासन करण्यासाठी गुडघ्यावर उभे रहा. यानंतर दोन्ही हात अलगद मागे करून दोन्ही तळपायांवर ठेवा.
"सासू नाही, माझी आईच...", सीमा देव यांची सून स्मिता सांगतेय, आई झालेल्या सासूचे जाणे...
यानंतर मान मागे करून पाठीमागची भिंत पाहण्याचा प्रयत्न करा. यामुळे मांडीच्या समोरच्या भागातील तसेच पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.
३. वीरासन (veerasan)
वीरासन केल्यामुळे पायावची चरबी तर कमी होतेच शिवाय पाठीचा कणा मजबूत होण्यासाठीही फायदा होतो. यासाठी आधी ताठ उभे रहा. एक पाय पुढे तर एक पाय मागे घ्या. दोन्ही पायांत दिड- दोन फुटाचे अंतर घ्या.
उपवासाला साबुदाणा- बटाटा नको, रताळी खा, ५ फायदे- उपवास करुन खरंच व्हाल फिट!
पुढचा पाय गुडघ्यात वाकवा. मागचा पाय तिरक्या रेषेत पण ताठ असू द्या. जमिनीला टेवून नका. दोन्ही हात डोक्यावर घ्या आणि तळहात एकमेकांना जोडा. ही आसन स्थिती ३० ते ३५ सेकंद टिकवा.