Join us  

मांड्या खूपच जाडजूड दिसतात- हिप्स फॅट पण वाढले? शिल्पा शेट्टी सांगतेय १ सोपा व्यायाम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2024 5:12 PM

How To Reduce Thigh Fat?: शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) सांगते आहे मांड्यांवरची चरबी, हिप्स फॅट खूप वाढले असतील तर ते कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करावा...

ठळक मुद्देही दोन्ही योगासनं केली तर शरीराला इतर  अनेक फायदे तर होतीलच, पण मांड्यांवरची चरबी, तसेच हिप्स फॅट कमी करण्यासाठीही मदत होईल.

बॉलीवूडची फिटनेस क्विन शिल्पा शेट्टीचं योगाप्रेम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. दररोज नियमितपणे,  न चुकता ती योगा करते, म्हणूनच तर वयाच्या पन्नाशीतही ती एवढी फिट आणि मेंटेन आहे. कोणता त्रास कमी करण्यासाठी कोणता व्यायाम करावा, कोणते आसन केल्याने काय फायदे होतात, याविषयीची माहिती ती नेहमीच सोशल मिडियावर शेअर करत असते. आता तिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये ती दोन योगासनं करताना दिसत आहे (How to reduce thigh fat?). एकामागे एक या पद्धतीने जर ही दोन्ही योगासनं केली तर शरीराला इतर  अनेक फायदे तर होतीलच, पण मांड्यांवरची चरबी, तसेच हिप्स फॅट कमी करण्यासाठीही मदत होईल. (Exercise and yogasana to reduce thigh fat and hips fat)

मांड्यांवरची चरबी, हिप्स फॅट कमी करण्यासाठी व्यायाम

 

१. शिल्पा शेट्टीने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये ती वीरभद्रासन आणि स्कंदासन हे २ व्यायाम करताना दिसते आहे.

२०२३ मध्ये भारतीयांनी अलेक्झाला 'हे' प्रश्न विचारून भंडावून साेडलं- तुम्हीही असंच काही विचारलं होतं?

२. व्यायामाच्या सुरुवातीला ती काही सेकंदासाठी मलासनमध्ये बसली आहे. यानंतर तिने वीरभद्रासन केले.

३. हे करण्यासाठी आधी दोन्ही पायांत अंतर घ्या. यानंतर उजव्या पायाचा अंगठा बाहेरच्या बाजुने काढा आणि तो पाय गुडघ्यात वाकवा. कंबरेपासून संपूर्ण शरीर उजवीकडे वळवा. डावा पाय ताणून घ्या आणि डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवा. हे झालं वीरभद्रासन.

 

४. आता यानंतर पुन्हा पहिल्या पोझिशनमध्ये या. दोन्ही पायांमध्ये अंतर राहू द्या. आता डावा पाय गुडघ्यातन वाकवा आणि खाली बसा. असं बसताना उजवा पाय पुर्णपणे ताणायला हवा.

मुलं सारखं मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसतात? ५ टिप्स- मुलांचं मोबाईलचं व्यसन होईल कमी

तो पाय गुडघ्यात वाकू देऊ नका. आसन करताना दोन्ही तळहात नमस्काराच्या अवस्थेत असावेत. हे झालं स्कंदासन. एकानंतर एका पायाने हे व्यायाम करा. 

५. हे व्यायाम केल्याने पेल्व्हिक आणि हिप्स भागातील स्नायूंचा व्यायाम होतो. बॉडी बॅलेन्सिंगसाठी उत्तम व्यायाम. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामशिल्पा शेट्टीयोगासने प्रकार व फायदे