Lokmat Sakhi >Fitness > मांड्या खूप जाड दिसतात-चालताना घासल्या जातात? 3 योगासनं करा, मांड्यांची चरबी होईल कमी

मांड्या खूप जाड दिसतात-चालताना घासल्या जातात? 3 योगासनं करा, मांड्यांची चरबी होईल कमी

How To Reduce Thigh Fat : मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही काही योगासनं करून मेंटेन शरीर मिळवू शकता. या योगासनांमुळे काही दिवसांतच तुमच्या मांड्यांचे पूर्ण फॅट कमी होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 12:09 PM2024-10-28T12:09:17+5:302024-10-28T12:15:59+5:30

How To Reduce Thigh Fat : मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही काही योगासनं करून मेंटेन शरीर मिळवू शकता. या योगासनांमुळे काही दिवसांतच तुमच्या मांड्यांचे पूर्ण फॅट कमी होईल.

How To Reduce Thigh Fat : Yoga Asanas That Will Help You To Reduce Your Thigh Fat | मांड्या खूप जाड दिसतात-चालताना घासल्या जातात? 3 योगासनं करा, मांड्यांची चरबी होईल कमी

मांड्या खूप जाड दिसतात-चालताना घासल्या जातात? 3 योगासनं करा, मांड्यांची चरबी होईल कमी

लठ्ठपणा आपल्या शरीरासाठी नुकसानकारक ठरतो. चुकीची  लाईफस्टाईल आणि फिजिकल एक्टिव्हीटीजच्या अभावामुळे शरीराच्या खालच्या भागाचे फॅट वाढत जाते. मांड्यांची चरबी एकदा वाढली तर ते कमी करणं कठीण होतं पण रोजच्या जीवनात या संबंधित अधिक समस्या उद्भवू लागतात. (How To Reduce Thigh Fat) ज्यामुळे जीन्स आणि कोणतेही वेस्टर्न कपडे सूट होत नाहीत. वजन वाढलं की ते कमी करणंही खूप महत्वाचे असते. मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही काही योगासनं करून मेंटेन शरीर मिळवू शकता. या योगासनांमुळे काही दिवसांतच तुमच्या मांड्यांचे पूर्ण फॅट कमी होईल. (Yoga Asanas That Will Help You To Reduce Your Thigh Fat)

उष्ट्रासन

उष्ट्रासन केल्यानं तुम्ही लठ्ठपणापासून वाचू  शकता. हे मांड्यांचे  फॅट कमी करण्यासाठी उत्तम ठरते. हे आसन करण्यासाठी तुम्हाला वज्रासनात आधी बसावं लागेल त्यानंतर गुडघ्यांवर उभं राहून पायांच्या पंजावर जोर देऊन नंतर टाचांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. या मुद्रेत राहून 5 ते  6 वेळा श्वास घ्या त्यानंतर आपल्या आधीच्या मुद्रेत परत या.

विंचरताना केसांचे पुंजके निघतात-खूप पातळ झाले? ५ रूपयांच्या कढीपत्त्याचा जादूई उपाय, दाट होतील केस

नटराजासन

नटराजासन केल्यानं तुमच्या मांड्यांची चरबी कमी होऊ शकते. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी सरळ मुद्रेत उभे राहा. त्यानंतर पाय मागच्या बाजूनं खेचा त्यानंतर हातानं अंगठ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर या मुद्रेत 1 मिनिटं राहा त्यानंतर पुढच्या बाजूनं वाकण्याचा प्रयत्न करा. काही सेकंद या मुद्रेत राहिल्यानंतर सामान्य स्थितीत या.

रोज किती वाजता चहा पिता? संध्याकाळी ७ नंतर चहा प्यायल्यानं उद्भवू शकतात ५ आजार

नौकासन

नौकासन योग्य पद्धतीनं केल्यास तुमच्या मांड्याचे स्नायू मजबूत होतात. याशिवाय मांड्या, पोट यांवर जमा झालेलं एक्स्ट्रा फॅट कमी होतं.  हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी सरळ झोपा त्यानंतर हळू हळू वर उठा. नंतर दोन्ही हातांना पायांनी  वर उचलून या अवस्थेत काहीवेळ राहा नंतर हळूहळू आधीच्या स्थितीत या. ही योगासनं केल्यानं मांड्यांचे फॅट कमी होईल. याव्यतिरिक्त  तुम्ही आजारांपासूनही दूर राहाल.

Web Title: How To Reduce Thigh Fat : Yoga Asanas That Will Help You To Reduce Your Thigh Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.