Lokmat Sakhi >Fitness > फक्त १ मिनिटाचा व्यायाम, फुल बॉडी रिलॅक्स; बघा मलायका अरोराचा रिलॅक्सेशन फंडा

फक्त १ मिनिटाचा व्यायाम, फुल बॉडी रिलॅक्स; बघा मलायका अरोराचा रिलॅक्सेशन फंडा

Yoga For Reducing Back Pain: कधी कधी मान- पाठ खूप आखडून जातं ना, मनावर पण खूपच ताण (stress) आल्यासारखं वाटतं.. त्यासाठीच तर बघा हा मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स (body and mind relaxation) करण्याचा एक खास व्यायाम.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 02:29 PM2022-07-12T14:29:56+5:302022-07-12T14:30:50+5:30

Yoga For Reducing Back Pain: कधी कधी मान- पाठ खूप आखडून जातं ना, मनावर पण खूपच ताण (stress) आल्यासारखं वाटतं.. त्यासाठीच तर बघा हा मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स (body and mind relaxation) करण्याचा एक खास व्यायाम.

How to relax body and mind just in 1 minute, yoga for relaxation, Malaika Arora's yoga for relaxation | फक्त १ मिनिटाचा व्यायाम, फुल बॉडी रिलॅक्स; बघा मलायका अरोराचा रिलॅक्सेशन फंडा

फक्त १ मिनिटाचा व्यायाम, फुल बॉडी रिलॅक्स; बघा मलायका अरोराचा रिलॅक्सेशन फंडा

Highlightsअवघ्या एका मिनिटांत करता येईल, असा व्यायाम सांगितला असून हा छोटासा व्यायाम केल्याने मन आणि शरीर या दोन्ही गोष्टी रिलॅक्स होण्यास मदत होईल, असं ती सांगते आहे. 

बॉलीवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा (Fitness Tips by Malaika Arora) नेहमीच तिच्या चाहत्यांना फिटनेस, आरोग्य याबाबत मोटीव्हेट करत असते. फिटनेसबाबत शेअर केलेले तिचे अनेक व्हिडिओ (fitness video) सोशल मिडियावर नेहमीच ट्रेंडींग असतात. आणि ते फिटनेस (how to improve fitness) जपण्यासाठी खूपच उपयुक्त ठरत असतात, अशी प्रतिक्रिया नेहमीच तिच्या चाहत्यांकडून येत असते. आता नुकताच मलायकाने तिचा एक वर्कआऊट व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. यामध्ये तिने अवघ्या एका मिनिटांत करता येईल, असा व्यायाम सांगितला असून हा छोटासा व्यायाम केल्याने मन आणि शरीर या दोन्ही गोष्टी रिलॅक्स (Malaika Arora's yoga for relaxation) होण्यास मदत होईल, असंही ती सांगते आहे. 

 

आज प्रत्येकाचंच कामाचं स्वरुप बदललं असून आपण अधिकाधिक काम बसूनच करतो आहोत. यामुळे शरीराला पाहिजे तेवढा व्यायाम होत नाही. ज्यांना ऑफिसवर्क असतं, त्यांना तासनतास एकाच अवस्थेत बसून काम करावं लागतं. यामुळे मान- पाठ- कंबर सगळंच आखडून जातं. शिवाय करिअर, खाजगी आयुष्य, नातेसंबंध यांच्यातून निर्माण झालेले वेगवेगळे ताणही असतातच. मनावरचं हे ओझं आणि आखडून गेलेलं शरीर या दोन्ही गोष्टी रिलॅक्स करायच्या असतील, तर मलायकाने सांगितलेला हा एका मिनिटाच्या व्यायाम काही दिवस नक्कीच करून बघा. 

 

कोणतं आसन करतेय मलायका?
व्हिडिओमध्ये मलायका अरोरा जे आसन करताना दिसते आहे, त्याला मार्जरासन असं म्हणतात. इंग्रजीमध्ये आपण त्याला Cat-Cow Pose असंही म्हणताे. हे आसन करण्यासाठी दोन्ही गुडघे आणि दोन्ही तळहात जमिनीवर टेकवा. आता हळूहळू मान वर करा आणि पाठीचा कणा खालच्या बाजूने आत घ्या.

पोट- हिप्सवर वाढले चरबीचे थर? शिल्पा शेट्टी सांगते सुपर योगा, व्हा स्लिमफीट  

याला कॅट पोझ म्हणतात. या अवस्थेत १० ते १५ सेकंद थांबल्यानंतर मान हळूहळू खाली घ्या, खांदे समाेरच्या दिशेने ओढा आणि पाठीचा कणा वरच्या बाजूने गोलाकार करा. ही अवस्था देखील १० ते १५ सेकंद टिकवा. याला काऊ पोझ म्हणतात. कॅट आणि काऊ पोझ एकानंतर एक अशा पद्धतीने ३ ते ४ वेळा करा. हे आसन दिवसांतून २ वेळा कधीही केले तरी चालते. 

 

मार्जरासन करण्याचे फायदे (benefits of marjarasana)
१. पाठीचा कणा रिलॅक्स होण्यासाठी हा व्यायाम अतिशय उपयुक्त ठरतो. कधी कधी बसून बसून पाठ आखडून जाते. अशावेळी हे आसन करा. पाठीच्या कण्याला एकदम आराम मिळेल.

रिंकू राजगुरुसारखं सुंदर दिसायचंय, करा तिच्यासारखी २ जबरदस्त आसनं; फिगर आणि फिटनेस कमाल 
२. बसण्याच्या, उभे राहण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेक जणांचे बॉडी पोश्चर बिघडलेले असते. त्यांच्यासाठी हे आसन फायदेशीर ठरेल. कारण बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होईल.
३. मनावरचा ताण, नैराश्य कमी करून मन शांत करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.
४. हे आसन नियमित केल्याने एकाग्रता वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही हे आसन फायदेशीर ठरते.
५. हे आसन पचनक्रिया आणि मेटाबॉलिझम सुधारण्यासही मदत करते. 

 

Web Title: How to relax body and mind just in 1 minute, yoga for relaxation, Malaika Arora's yoga for relaxation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.