शिक्षण, करिअर, रिलेशन, आर्थिक गणितं.. कशाचा ना कशाचा ताण प्रत्येकाच्या मागे असताेच. त्यात काही महिलांना तर ताण घेण्याची जरा जास्तच सवय असते. छोट्या- छोट्या गोष्टींनीही त्या हैराण होऊन जातात. लगेचच टेन्शन येतं आणि मग ते इतकं वाढतं की काय करावं काही सुचत नाही. या ताणापायी मग चांगल्या जमणाऱ्या गोष्टीही त्यांच्या हातून बिघडून जातात. मनावर ओझं आल्यासारखं, जीव दडपून गेल्यासारखं वाटतं (How to release stress? How to reduce anxiety?). असं तुमचंही होत असेल, तर त्यावरचा एक उत्तम उपाय सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी (Yoga Expert Anushka Parwani) यांनी सांगितला आहे.
अभिनेत्री अनन्या पांडेपासून ते करिना कपूर पर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या योगा- फिटनेस ट्रेनर म्हणून अनुष्का परवानी ओळखल्या जातात.
अभिनेत्री यामी गौतमने केला बनाना केक, लाडक्या भाच्यासाठी तिने केलेल्या केकची बघा खास रेसिपी
त्या नेहमीच सोशल मिडियावर ॲक्टीव्ह असतात आणि त्यांच्या वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना, सामान्य लोकांनाही व्यायामासाठी, फिटनेससाठी मोटिव्हेट करत असतात. आता नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्यांनी मानसिक ताण- तणाव कमी करण्यासाठी १२ सेकंदाचा एक सोपा उपाय सांगितला आहे. बॉक्स ब्रिदिंग नावाचा हा एक श्वसनाचा व्यायाम आहे.
कसं करायचं बॉक्स ब्रिदिंग (Box Breathing)१. बॉक्स ब्रिदिंग करण्यासाठी ताठ बसा. डोळे मिटून घ्या आणि तुमच्या मनात एक चौकोनी बॉक्सचे चित्र आणा.
२. आता सुरुवातीला ३ सेकंद श्वास घ्या.
दिवाळीत केलेले बेसनाचे लाडू उरलेत? लाडवांचा करा एक खास पदार्थ, अतिशय सोपा आणि चवदार
३. पुढचे ३ सेकंद घेतलेला श्वास रोखून ठेवा.
४. त्यानंतरचे ३ सेकंद श्वास सोडा.
५. त्यानंतर पुन्हा ३ सेकंद श्वास रोखून ठेवा.
६. मनावर ताण आल्यासारखं वाटलं की ही क्रिया ५ ते ६ वेळा अशाच पद्धतीने पुन्हा पुन्हा करा. लवकरच मन शांत झाल्यासारखं वाटू लागेल.