Join us  

डेस्क जॉबमुळे शारीरिक हालचाल होत नाही ? ५ सोपे उपाय, डेस्क जॉब करुनही फिट राहण्याचा सोपा फंडा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2023 2:37 PM

Tips For Staying Healthy With A Desk Job : डेस्क जॉब करणाऱ्यांना पाठ, मान आणि गुडघेदुखीची समस्या नेहमीच असते, ज्यापासून बचाव करण्यासाठी आपण या टिप्स फॉलो करु शकता...

आजच्या काळात बहुतेकजण हे ऑफिसमध्ये डेस्क जॉबचं करतात. डेस्क जॉब हा आता सध्या सगळ्यांच्याच लाइफस्टाईलचा एक महत्वाचा भाग बनला आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ सगळेचजण एकाच डेस्कवर तासंतास एकाच जागी बसून आपले काम करतात. रोज ऑफिसमध्ये वेळेवर पोहोचणे, डेस्कवर बसून (Staying fit and healthy when you sit at a desk all day) आपले काम करणे आणि काम संपवूनच उठणे ही आपली रोजची सवय झाली आहे. रोज तासंतास एकाच जागी एकाच स्थित बसून तेच ते काम करणे याचा आता हळुहळु आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे(5 Tips To Help You Stay Healthy at Work). 

डेस्क जॉब हा एकाच जागी तासंतास बसून केल्यामुळे आपल्या शरीराची हालचाल (Simple Tips To Stay Healthy In desk Job) कमी होऊ लागली आहे. ऑफिसमध्ये सतत ८ ते ९ तास एकाच जागी बसून घालवल्यामुळे याचा आपल्या आरोग्यावर व शरीरावर परिणाम होऊ लागला आहे. एकाच जागी दिवसभर एकाच स्थित बसून काम केल्यामुळे लोकांमध्ये अनेक आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे. लठ्ठपणा, हाय कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, पाठीचा कणा दुखणे, मान आणि गुडघेदुखी (How to Make Your Desk Job Healthier)अशा समस्या वाढत आहेत. अशा लाईफस्टाईलमुळे आजकाल कमी वयातील तरुणांना देखील असे गंभीर आजार होताना दिसत आहे. परंतु असे असताना देखील डेस्क जॉब (Want To Stay Healthy But Have A Desk Job? 5 Quick And Easy Ways To Keep Fit) करूनही आपण स्वतःला फिट ठेवू शकतो. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मनन व्होरा यांनी काही टिप्स शेअर केल्या आहेत ज्यांच्या मदतीने आपण डेस्क जॉब करूनही निरोगी व फिट अँड फाईन राहू शकतो(How To Stay Fit While Working a Desk Job). 

डेस्क जॉब करताना फिट राहण्यासाठी ५  टिप्स... 

१. डेस्क व्यवस्थित सेट करा :-  जर आपणसुद्धा दिवसांतील ८ ते ९ तास सलग डेस्क जॉब करत असाल, तर सर्वात आधी तुमचा डेस्क तुमच्या सोयीनुसार सेट करुन घ्यावा. आपले दिवसातील बरेचसे तास हे ऑफिसमध्येच जातात त्यामुळे ऑफिसमध्ये एवढा वेळ बसण्यासाठी आपला डेस्क व्यवस्थितच हवा. यासाठी आपली खुर्ची, किबोर्ड आणि कॉम्प्युटर स्क्रीन अशा ठिकाणी व्यवस्थित ठेवल्याची खात्री करुन घ्या, जिथे तुम्हाला त्यांचा वापर करताना फारशी अडचण येणार नाही. जर आपला डेस्क आपल्याला हवा तसा व्यवस्थित सेट व आरामदायी असेल तर आपल्याला मान आणि पाठदुखीचा त्रास होणार नाही. 

२. २०-२०-२० चा नियम पाळा :- दर २० मिनिटांनी डोळे उघडझाप करण्यासाठी एक छोटा ब्रेक घ्या. यामुळे डोळ्यांवर ताण न येता आराम मिळतो. २० मिनिटे दीर्घ श्वास घ्या आणि सोडा, त्याचबरोबर २० सेकंदांसाठी आपले संपूर्ण शरीर स्ट्रेच करुन घ्यावे. कॉम्प्युटर स्क्रीनकडे सतत पाहणे टाळण्यासाठी आपले डोळे स्क्रीनपासून काही काळ लांब ठेवा. या दरम्यान, दीर्घ श्वास घेण्याचा हलका व्यायाम जरुर करावा. 

दिवाळीत खा - खा फराळ खाऊन वजन वाढू नये म्हणून लक्षात ठेवा या ६ गोष्टी, खा पोटभर...

तासंतास ऑफिसमध्ये बाक काढून - वाकून बसता ? चुकीच्या बॉडी पोश्चर सुधारण्याचे ७ फायदे, पाठीचा कणा सांभाळा...

३. स्ट्रेचिंगचे व्यायाम करावेत :- आपण डेस्कवर बसल्या बसल्या करता येतील असे स्ट्रेचिंगचे व्यायाम जरुर करावेत. सोप्या स्ट्रेचिंग व्यायामाने आपल्या  शरीराची लवचिकता टिकून राहते. मान, हात, पाय यांसारख्या अवयवांचे आपण स्ट्रेचिंग करु शकता. यामुळे तासंतास तसेच बसून आपले अवयव आखडणार नाहीत. थोड्या थोड्या वेळाने शरीराची अशी हालचाल होत राहिली तर आपल्याला देखील काम करताना फ्रेश वाटेल. असे केल्याने शरीरातील तणाव दूर होतो आणि मनही शांत राहते. 

४. माइंडफुल ब्रिथिंग करा :- डेस्कवर बसून काम करता करता आपण ब्रिथिंग एक्सरसाइज देखील करु शकता. शांत मनाने दीर्घ श्वास घेतल्याने तणाव कमी होतो. माइंडफुल ब्रिथिंग करण्यासाठी, डोळे बंद करून दीर्घ श्वास भरुन घ्या, श्वास थोडा वेळ रोखून ठेवा, नंतर हळुहळु श्वास सोडा. अशा प्रकारे माइंडफुल ब्रिथिंग दिवसांतून ३ ते ४ वेळा आपण करु शकता.  

५. सतत डेस्कवर बसणे टाळा :- जरी आपला डेस्क जॉब असला तरीही सतत डेस्कवर बसणे टाळा. शक्य असल्यास,  थोड्या थोड्या वेळाने उभे राहा किंवा कामाच्या दरम्यान काही पावले चालत जा. हा उपाय केल्याने स्नायूंवरील दाब कमी होतो, वेदनांपासून आराम मिळतो, रक्तातील साखर नियंत्रणात राहते, तसेच रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. त्यामुळे थोड्या लहान - मोठ्या हालचाली, स्ट्रेचिंग, एक्सरसाइज दिवसभर करत राहा, सतत डेस्कवर एकाच जागी बसून राहणे शक्यतो टाळा.

मलासनात बसून पाणी पिण्याचे आहेत भन्नाट फायदे, पोटाचे विकार अनेक समस्या होतील कायमच्या दूर...

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स