Lokmat Sakhi >Fitness > उद्यापासून डाएट नक्की असं म्हणता पण करत कधीच नाही? सोप्या १० टिप्स, तुम्ही ठरवाल ते होईल...

उद्यापासून डाएट नक्की असं म्हणता पण करत कधीच नाही? सोप्या १० टिप्स, तुम्ही ठरवाल ते होईल...

Tips to stay motivated to eat healthy : How to Stick to a Healthy Diet : Simple Ways to Boost Your Motivation to Eat Healthy : आपले डाएट, एक्सरसाइज सगळे जमेल मस्त, पाहा युक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2024 05:18 PM2024-08-28T17:18:17+5:302024-08-28T17:32:41+5:30

Tips to stay motivated to eat healthy : How to Stick to a Healthy Diet : Simple Ways to Boost Your Motivation to Eat Healthy : आपले डाएट, एक्सरसाइज सगळे जमेल मस्त, पाहा युक्ती

How to stay motivated to eat healthy tips to stay motivated to eat healthy How to Stick to a Healthy Diet | उद्यापासून डाएट नक्की असं म्हणता पण करत कधीच नाही? सोप्या १० टिप्स, तुम्ही ठरवाल ते होईल...

उद्यापासून डाएट नक्की असं म्हणता पण करत कधीच नाही? सोप्या १० टिप्स, तुम्ही ठरवाल ते होईल...

वजन वाढले की ते कमी करण्यासाठी आपण डाएट फॉलो करतो. योग्य डाएट आणि एक्सरसाइज यांच्या मदतीने आपण वाढलेले वजन अगदी सहज कमी करु शकतो. परंतु वजन कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइजची सुरुवात करण्यासाठी आपण खूप कंटाळा करतो. डाएट, एक्सरसाइज असे फार कष्ट न घेता आपले वजन कमी व्हावे असे मनोमन वाटत असले तरीही तसे होत नाही. डाएट, एक्सरसाइज असे रुटीन फॉलो करण्याची सुरुवातच थोडी कठीण असते. परंतु एकदा का आपण ते फॉलो करण्यास सुरुवात केली की त्याची सवय होते(Tips to stay motivated to eat healthy).

काहीवेळा तर आपण या आठवड्याच्या सुरुवातीपासून रुटीन फॉलो करु किंवा या महिन्याच्या १ तारखेपासून हे सगळे फॉलो करु असे ठरवतो खरे. पण आठवड्याचा तो सोमवार आणि महिन्याची ती १ तारीख कधीच येत नाही. आजपासून करु, उद्यापासून करु असे अनेक बहाणे आपण स्वतःच स्वतःला देत असतो. यामुळे डाएट आणि एक्सरसाइजला (How to Stick to a Healthy Diet) सुरुवात करण्यास आपला खूप वेळ असाच जातो. परंतु काही सोप्या टिप्सचा वापर करुन आपण स्वतःच स्वतःला हे डाएट रुटीन फॉलो करण्यासाठी मोटिवेशन देऊ शकतो. या टिप्सचा वापर करुन आपण आपले डाएट आणि एक्सरसाइज असे हेल्दी रुटीन वेळेत सुरु करु शकतो. या टिप्स नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूयात( Simple Ways to Boost Your Motivation to Eat Healthy).

 १.  हेल्दी रुटीन फॉलो करण्यासाठी स्वतःला मोटिवेट कसे कराल ? 

१. सगळ्यात आधी वजन कमी करण्यासाठीचे तुमचे ध्येय कोणते आहे ते ध्येय आधी निश्चित करा. आपले डाएट हेल्दी करण्यासाठी आधी आपले लक्ष्य ठरवा. उदाहरणार्थ :- मी वजन कमी करण्यासाठी हेल्दी डाएट घेत आहे किंवा मी शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी हेल्दी डाएट घेत आहे. असे तुमचे एक ध्येय ठरवा. जेव्हा तुमची ध्येये स्पष्ट असतात, तेव्हा ती साध्य करण्याची तुमची प्रेरणा वाढते.

२. एकदम एकाचवेळी मोठ्या ध्येयांऐवजी लहान ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. जसे की, या आठवड्यात हेल्दी पदार्थ खाण्याची स्वतःला सवय लावणे.

३. जर तुम्ही तुमची ठरवलेली छोटी ध्येय पूर्ण केलीत किंवा हेल्दी सवयींचे पालन केल्यास  स्वतःच स्वत: ला बक्षीस द्या. यामुळे तुमच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रोत्साहन मिळू शकते. 

झटपट वजन घटवण्यासाठी खूप घाम गाळताय? थांबा, न्यूट्रिशनिस्ट सांगतात घाम आणि वजनाचा थेट संबंध...

४. हेल्दी डाएट घेतल्यानंतर आपल्या शरीरात तसेच आरोग्यात काय प्रकारचे बदल होतात यांवर लक्ष द्या. जेणेकरुन तुम्हालाच तुमच्यातील बदल जाणवतील आणि त्यामुळे तुम्ही हेल्दी डाएट करण्याकडे अजून चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकता. जर तुम्हाला याचे चांगले परिणाम मिळू लागले तर तुम्ही स्वतःला दीर्घकाळ हेल्दी सवयी फॉलो करण्यासाठी प्रेरित करू शकाल.

५. नवनवीन आणि टेस्टी, हेल्दी रेसिपीज शिकून घ्या. रोजचे हेल्दी डाएट मजेदार करुन, तुम्ही तुमच्या डाएटमध्ये आरोग्यदायी पर्यायांचा समावेश कराल.

६. वजन कमी करण्यासाठी स्वतःला मोटिवेट करताना त्या विषयासंदर्भातील पुस्तके, व्हिडीओ बघण्यावर अधिक जास्त भर द्यावा. 

वाढलेले वजन-पोटाची ढेरी करेल आल्याचा इंचभर तुकडा, पाहा ‘हा’ जादूई उपाय-सोपा आणि असरदार...

२. हेल्दी डाएट फॉलो करण्यासाठी स्वतःमध्ये कोणते बदल करावेत? 

१. जंक फूड, फास्ट फूड आणि साखरेचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ कमी प्रमाणात खावेत. त्याऐवजी, आपल्या डाएटमध्ये ताजी फळे, भाज्या आणि कडधान्य यांसारख्या हेल्दी पदार्थांचा समावेश करावा. 

२. मैद्यापासून तयार झालेले ब्रेड, पास्ता खाणे टाळावे. पांढऱ्या तांदुळाऐवजी ब्राउन राईस, ओट्स आणि गव्हापासून तयार झालेले पदार्थ खाण्यावर अधिक भर द्यावा. यातून आपल्या शरीराला आवश्यक ते फायबर आणि इतर पोषक घटक मिळतात. 

३. ट्रान्स फॅट्स ऐवजी ओमेगा - ३ फॅटी ऍसिड असलेले पदार्थ जास्त प्रमाणांत खावेत. 

४. साखर आणि मीठ कमी प्रमाणात खा. यासाठी प्रोसेस्ड फूड असणारे पदार्थ खाणे सोडून द्यावे. गोड मिठाईपासून दूर राहा आणि ताजी फळे व भाज्या खाण्याचे प्रमाणात आपल्या डाएटमध्ये वाढवा.

५. आपल्या आहारात शक्य तितक्या रंगीबेरंगी फळ आणि भाज्यांचा समावेश करा. यातून आपल्या शरीराला अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात तसेच यामुळे रोग प्रतिकारशक्ती देखील मजबूत होते. 

६. दिवसभरात पुरेसे पाणी पिणे महत्वाचे आहे. दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या आणि साखरयुक्त पेय घेण्याऐवजी ग्रीन टी प्यावी. 

७. जेवणाच्या वेळा पाळा ठराविक अंतराने काही ना काही हेल्दी खात राहा. त्यासोबतच जेवण कधीही स्किप करु नका. यामुळे तुमची पचन क्रिया संतुलित राहून आपल्या शरीराची ऊर्जा पातळी वाढण्यास मदत मिळते.

Web Title: How to stay motivated to eat healthy tips to stay motivated to eat healthy How to Stick to a Healthy Diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.