काही जण नेहमीच घामेजलेले दिसतात. खूप घाम येत असल्याने एका हातात घाम पुसण्यासाठी सारखा रुमाल ठेवावाच लागतो. पावसाळा असो की हिवाळा, यांना घाम येणं काही कमी होतंच नाही. थोडीशी शारिरीक मेहनत झाली तरी भरपूर घाम येतो. खरंतर कोणत्याच गोष्टीचा अतिरेक बरा नाही. त्यामुळे खूप घाम येणं हे देखील काही चांगलं लक्षण नाही. त्यामुळे जरा जास्तच घाम येत असेल, तर त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. पण डॉक्टरांकडे जाण्यापुर्वी योगतज्ज्ञांनी सांगितलेल्या या २ योगमुद्राही (Yog Mudra) करून बघा. यामुळे अतिघाम, घामाचा दुर्गंध (excessive sweating and it's odour) या गोष्टी तर कमी होतीलच, पण इतरही काही लाभ मिळतील.
घाम येण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून...
जलोदर नाशक मुद्रा
१. जलोदर नाशक मुद्रा करण्यासाठी हाताचे तळवे आधी सरळ ताठ करा.
हत्ती करतोय मुलीची नक्कल! सांगा कुणाचा डान्स अधिक छान, मुलीचा की हत्तीचा? व्हिडिओ व्हायरल
२. यानंतर करंगळी दुमडून खाली घ्या.
३. अंगठ्याच्या टोकाने करंगळीच्या नखाच्या वरचा जो भाग असतो, त्यावर जोर द्या. उर्वरित ३ बोटे सरळ पण रिलॅक्स ठेवावीत.
४. एका जागी शांत बसून डोळे मिटून ७ मिनिटांसाठी ही मुद्रा करावी.
५. यानंतर पुढील ७ मिनिटांसाठी प्राणमुद्रा करावी. प्राणमुद्रा करण्यासाठी करंगळी, तिच्या बाजूचे बोट आणि अंगठा दुमडून घ्यावीत आणि त्यांची टोके एकमेकांना जोडून दाब द्यावा.
जलोदर मुद्रा करण्याचे फायदे
१. शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्यासाठी ही मुद्रा उपयोगी ठरते.
बिपाशा बसू म्हणते मला डोहाळे लागलेत, सारखा खावासा वाटतोय हा 'गोड' पदार्थ
२. शरीरावर सारखी सूज येत असेल तर ही मुद्रा करून बघावी.
३. काही जणांना वारंवार लघवी लागण्याचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी जलोदर मुद्रा उपयाेगी ठरते.
४. मासिक पाळीत होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव तसेच पोटदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त मुद्रा.
५. काही जणांच्या डोळ्यातून सतत पाणी येतं, नाक सारखं वाहतं, हा त्रास देखील या मुद्रेने कमी होतो.