पोटात गॅस जमा झाल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं तर काहीजणांना अस्वस्थ वाटतं. चारचौघात काहीजणांना गॅस पास करायला अवघडल्यासारखं वाटतं. गॅस कंट्रोल करणं सामान्य वाटत असलं तरी यामुळे अनेक गंभीर त्रास होऊ शकतात. ज्याप्रमाणे शरीरातून घाम बाहेर पडतो त्याप्रमाणे गॅसही बाहेर पडतो. घाम येणं, लघवी येणं याप्रमाणे गॅस पास होणं या नैसर्गिक क्रिया तुम्ही रोखू शकत नाही. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.रेखा राधामोनी यांनी गॅस पास करण्याचे काही फायदे सांगितले आहेत. (Ayurvedic expert rekha radhamony why trying to stop fart or stomach gas is harmful for your health)
आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डॉक्टरांनी गॅस पास करणं बंद केल्याने शरीराला होणाऱ्या नुकसानीची माहितीही दिली आहे. ही माहिती शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, आयुर्वेदानुसार पादणे चांगले आहे. श्वास घेणे किंवा घाम येणे यासारखी ही एक सामान्य प्रक्रिया आहे.
डॉ. रेखा राधामोनी यांच्या मते, जेव्हा पचनक्रिया गतिमान होते तेव्हा गॅस तयार होतो. हा वायू तयार झाल्यावर तो शरीरात खालच्या दिशेने वाहत असतो. ज्याला अधोगत वात किंवा फार्ट म्हणतात. तहान लागणे, भूक लागणे, लघवी होणे यासारखी ही एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. जी थांबवता कामा नये. यासोबतच डॉ.रेखा राधामोनी यांनी पादणं बंद करण्याचे तोटेही सांगितले आहेत.
१) वायूचा प्रवाह वरच्या दिशेने असू शकतो. हे देखील तुमच्या डोकेदुखीचे कारण असू शकते. तुम्ही गॅस पास करणं थांबवल्यावर शरीरात निर्माण होणारा वायू तुमच्या शरीरातच राहतो. जी नंतर मोठी समस्या बनते.
२) फार्ट बंद झाल्याचा परिणाम पचन प्रक्रियेवर होतो. डॉ. रेखा राधामोनी यांच्या पोस्टनुसार, फार्ट थांबवण्याचा प्रयत्न केल्याने पोटात सूज येऊ शकते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या तक्रारी असू शकतात किंवा व्यक्ती चव घेण्याची क्षमता गमावू शकते. फार्ट थांबवण्यासोबतच शरीराचे अनेक नुकसान होऊ शकते.
३) पोटाचा भाग जो पादणे थांबवण्यासाठी सर्वात जास्त प्रवास करतो तो कोलन आहे. फार्टच्या माध्यमातून अनेक प्रकारची रसायनेही वायूच्या रूपात शरीरातून बाहेर पडतात. जे आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्यास हानी पोहोचवतात. फार्ट बंद केल्यावर अशी रसायने शरीरात राहतात. त्यामुळे कोलन कॅन्सरचा धोका वाढतो.
४) जेव्हा तुम्ही गॅस पास करणं थांबवता तेव्हा आतड्यांवर वाईट परिणाम होतो. खासकरून आतड्यांचा खालचा भाग दबावाखाली येतो.