Lokmat Sakhi >Fitness > डोक्यात सतत नको ते विचार येतात? छोट्या गोष्टींचाही ताण येतो? मन शांत होण्यासाठी बघा उपाय

डोक्यात सतत नको ते विचार येतात? छोट्या गोष्टींचाही ताण येतो? मन शांत होण्यासाठी बघा उपाय

How To Stop Over Thinking: काही जणींना कोणत्याही गोष्टींचा खूपच जास्त विचार करण्याची सवय असते. तुमचंही असंच असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा...(best and simple remedies to reduce stress)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2024 12:02 PM2024-08-14T12:02:39+5:302024-08-14T12:03:30+5:30

How To Stop Over Thinking: काही जणींना कोणत्याही गोष्टींचा खूपच जास्त विचार करण्याची सवय असते. तुमचंही असंच असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा...(best and simple remedies to reduce stress)

how to stop over thinking, best and simple remedies to reduce stress, benefits of bhramari pranayam, how to do  bhramari pranayam | डोक्यात सतत नको ते विचार येतात? छोट्या गोष्टींचाही ताण येतो? मन शांत होण्यासाठी बघा उपाय

डोक्यात सतत नको ते विचार येतात? छोट्या गोष्टींचाही ताण येतो? मन शांत होण्यासाठी बघा उपाय

Highlightsभ्रामरी प्राणायाम नियमितपणे केल्यास स्मरणशक्ती चांगली राहाते. त्यामुळे लहान मुलांनाही ते करायला लावावे.

अमूक व्यक्ती मला तसंच म्हणाली..., तमूक व्यक्तीने मला हे विचारलंच नाही..., ती माझ्याशी बोललीच नाही...., ही माझ्याबद्दल काय विचार करत असेल.... अशा असंख्य गोष्टींचा गुंता काही जणींच्या मनात सतत चाललेला असतो. लहानसहान गोष्टींचा ताण घेण्याचे, त्याचा स्वत:ला त्रास करून घेण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक असते. या अतिविचाराने मग अनेकींची तब्येत खराब होते, मूड कायम ऑफ असतो. आणि झोपेवरही त्याचा परिणाम होतोच. डोक्यातला हा निरर्थक विचारांचा गुंता काढून टाकायचा असेल तर काय उपाय करावा (how to stop over thinking), याविषयी सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवाणी यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ बघा..(best and simple remedies to reduce stress)

 

डोक्यात सतत विचार येत असतील तर काय उपाय करावा?

मनातला विचारांचा गुंता कमी करून मन शांत करण्यासाठी भ्रामरी प्राणायाम करण्याचा सल्ला अंशुका परवानी यांनी दिला आहे. रोज रात्री झोपण्यापुर्वी २१ वेळा भ्रामरी प्राणायाम करावे, असे त्या सांगतात.

त्वचेसाठी, केसांसाठी राईस वॉटर चांगलंच..! पण ते करायचं कसं? बघा सोपी पद्धत- सौंदर्य खुलेल

कसे करावे भ्रामरी प्राणायाम?
भ्रामरी प्राणायाम करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ बसा. त्यानंतर दोन्ही हातांच्या अंगठ्यांनी दोन्ही कानं बंद करा. दोन्ही हातांच्या तर्जनी कपाळावर ठेवा. मधले बोट आणि त्याच्या बाजुचे बोट डोळ्यांवर ठेवून डोळे बंद करा. दोन्ही हातांच्या करंगळी गालावर ठेवा. यानंतर दिर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत हळूहळू ओंकार म्हणा. यातला ओमकार लहान ठेवून म कार मोठा असावा. असे साधारण २१ वेळा करावे.

 

भ्रामरी प्राणायाम करण्याचे फायदे 

१. एकाग्रता वाढविण्यासाठी भ्रामरी प्राणायाम उपयुक्त ठरते.

२. भ्रामरी प्राणायाम नियमितपणे केल्यास स्मरणशक्ती चांगली राहाते. त्यामुळे लहान मुलांनाही ते करायला लावावे.

भोपळ्याची भाजी नको? गरमागरम सूप करून प्या! अतिशय चवदार- पौष्टिक, चटकन बघा रेसिपी

३. ताण कमी करण्यासाठी हे प्राणायाम उत्तम आहे.

४. मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी मदत होते.

५. ज्यांना खूप राग येतो, त्यांनी रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी भ्रामरी प्राणायाम करावे...



 

Web Title: how to stop over thinking, best and simple remedies to reduce stress, benefits of bhramari pranayam, how to do  bhramari pranayam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.