लठ्ठ्पणानं त्रस्त असलेल्यांनी व्यायमाबरोबरच काही घरगुती उपाय करायला हवेत. ज्यामुळे वेगानं वजन कमी होण्यास मदत होईल. लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्ही पेरूचा आहारात समावेश करू शकता. पेरूच्या पानांचा वापर करून वजन कमी करणं सहज शक्य होतं. (Guava Leaves For Weight Loss) पेरूच्या पानांत कॅलरीज कमी असतात. जे खाल्ल्यानं बराचवेळ भूक लागत नाही. पेरूच्या पानांचा वापर कसा करायचा ते समजून घेऊ. (How To Use Guava Leave For Weight Loss)
एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार पेरूच्या पानांमध्ये मिनरल्स, व्हिटामीन्स, कॅल्शियम, पोटॅशियम, सल्फर, सोडीयम, आयर्न, बोरोन, मॅग्नेशियम, व्हिटामीन सी आणि व्हिटामीन बी असते. पेरूच्या पानांमध्ये एंटी ऑक्सिडेंट्स, हायपोग्लायसेमिक, एंटी कॅन्सर आणि इतर बायोलॉजिकल एक्टिव्हीज असतात (Ref). यात एंटी ऑक्सिडेंट्स, एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी ट्यूमरर्स अर्क असतो. यात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते ज्यामुळे इम्यूनिटी चांगली राहते. तर यातील व्हिटामीन बी मुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते.
पेरूची पानं तुम्ही अशीच सुद्धा खाऊ शकता. पण जर तुम्हाला पेरूच्या पानांची चव आवडत नसेल तर तुम्ही पेरूच्या पानांची चहासुद्धा पिऊ शकता. पेरूच्या पानांच्या चहाचे सेवन सकाळी रिकाम्या पोटी करा. यामुळे शरीरावर परिणाम दिसायला सुरूवात होईल.
पेरूच्या पानांचा चहा कसा करायचा?
सगळ्यात आधी पेरूची जवळपास ५ ते ६ पानं धुवून घ्या. नंतर एका भांड्यात एक ग्लास पाणी घालून त्यात पेरूची पानं घाला. नंतर १० मिनिटं ही पानं चांगली उकळू द्या. त्यानंतर पाणी अर्ध झाल्यावर चहाप्रमाणे याचे सेवन करा. पेरूच्या पानांमध्ये एंटी बॅक्टेरिअल आणि एंटी मायक्रोबियल गुण असतात जे गॅस्ट्रिक अल्सरपासून वाचवतात. पेरूच्या पानांचा वापर केल्यास डायरियाचा त्रास दूर होण्यास फायदा होतो.
याव्यतिरिक्त जुनाट खोकला, खाज यांसारख्या समस्या टाळण्यासाठी या पानांचा वापर फायदेशीर ठरतो. पेरूच्या पानांचा उपयोग करून कोलेस्टेरॉल कमी करता येते आणि यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते हार्ट आणि डायबिटिसच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते.