Lokmat Sakhi >Fitness > १ चमचा मध रोज खा, चेहऱ्यावर येईल ग्लो-वजन होते कमी; वाढत्या वजनावरुन टोमणे होतील बंद

१ चमचा मध रोज खा, चेहऱ्यावर येईल ग्लो-वजन होते कमी; वाढत्या वजनावरुन टोमणे होतील बंद

How to Use Honey Diet for Weight Loss : आयुर्वेदात मधाला बेस्ट फॅट बर्नर म्हणून ओळखले जाते, जर आपल्याला व्यायाम-डाएट फॉलो करायला जमत नसेल तर, फक्त रोज एक चमचा मध खा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2023 03:09 PM2023-11-29T15:09:20+5:302023-11-29T15:10:08+5:30

How to Use Honey Diet for Weight Loss : आयुर्वेदात मधाला बेस्ट फॅट बर्नर म्हणून ओळखले जाते, जर आपल्याला व्यायाम-डाएट फॉलो करायला जमत नसेल तर, फक्त रोज एक चमचा मध खा..

How to Use Honey Diet for Weight Loss | १ चमचा मध रोज खा, चेहऱ्यावर येईल ग्लो-वजन होते कमी; वाढत्या वजनावरुन टोमणे होतील बंद

१ चमचा मध रोज खा, चेहऱ्यावर येईल ग्लो-वजन होते कमी; वाढत्या वजनावरुन टोमणे होतील बंद

वजन वाढलं की फक्त शरीरातील चरबी वाढत नाही. यासोबत आजारही वाढतात. त्यामुळे वेळीच वजनावर नियंत्रण (Weight Loss) मिळवायला हवे. वजन कमी करण्याचे अनेक फंडे सध्या बाजारात उपलब्ध आहेत. बरेच औषधं देखील वजन कमी करत असल्याचा दावा करतात. पण वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट या दोन गोष्टी महत्वाच्या ठरतात.

वजन कमी करण्याच्या केमिकल प्रॉडक्ट्सऐवजी आपण भारतीय मसाल्यांचा आहारात समावेश करू शकता. हळद, दालचिनी यासह मध (Honey for Weight Loss) देखील वजन कमी करण्यास मदत करू शकते. आयुर्वेदात मधाला खूप महत्व आहे. याला बेस्ट फॅट बर्नर म्हणूनही ओळखले जाते. पण वजन कमी करण्यासाठी मधाचे सेवन कसे करावे याची माहिती आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉक्टर दीक्षा यांनी दिली आहे(How to Use Honey Diet for Weight Loss).

मधाचे गुणधर्म

मध हा वजन कमी करण्याचा नैसर्गिक उपाय मानला जातो. मध औषधी गुणधर्म, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांव्यतिरिक्त फिटनेस सुधारण्यासाठी देखील ओळखले जाते. वजन कमी करण्यासोबत मध आरोग्य सुधारण्यासही मदत करते. शिवाय डोळे, कफ-कोल्ड, स्किन, हृदयाच्या निगडीत समस्या यासह यूरिनरी ट्रॅक्ट डिसऑर्डरवरही फायदेशीर ठरते.

आता स्नॅक्स खाऊनही होईल वजन कमी, पाहा ५ प्रकारचे हेल्दी-क्रंची स्नॅक्स; वेट लॉससाठी बेस्ट-तोंडाची चवही वाढेल

वजन कमी करण्यासाठी मध कसे काम करते

- आयुर्वेदानुसार फ्रेश मध वजन वाढवण्यासाठी शिवाय बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यास मदत करते. शिवाय स्टोर करून ठेवलेलं मध चयापचय सुधारण्यास मदत करते, यासह कफ-कोल्डचा त्रासही दूर होतो.

- मधामध्ये फ्रुक्टोज आढळते, जे फॅट बर्न करण्यासाठी उपयुक्त ठरते. जर आपण वजन कमी करण्यासाठी मधाचे सेवन करत असाल तर, कोमट पाण्यात एक चमचा मध मिसळून रिकाम्या पोटी प्या. असे केल्याने पचनक्रिया सुधारते, शिवाय शरीरातील अतिरिक्त चरबी झरझर घटते.

- बहुतांश लोकं चहा किंवा कॉफीमध्ये साखर मिसळून पितात. साखरेऐवजी आपण मधाचा देखील वापर करू शकता. पदार्थातील गोडवा वाढवण्यासाठी आपण साखरेऐवजी मध घालून खाऊ शकता.

तोंडाचा ताबा सुटतो? चॉकलेट-आइस्क्रीम खाऊनही वजन कमी होते, व्हॉल्यूमेट्रिक डाएटचा नवा फंडा

- आपण झोपण्यापूर्वी एक चमचा मध खाऊ शकता. यामुळे झोपेच्या सुरुवातीच्या काही तासांमध्येच शरीरातील चरबी जळण्यास सुरुवात होईल.

आयुर्वेदानुसार मधाचे सेवन कसे करू नये

- आयुर्वेदानुसार चुकीच्या पद्धतीने मध खाल्ल्यास आपण आजारी पडू शकता.

- काही लोकं पदार्थ तयार करताना मध घालतात. मध गरम केल्याने त्यातील एन्झाइम्स नष्ट होतात, ज्यामुळे पचनक्रिया बिघडते. याशिवाय शरीरात विषारी पदार्थ तयार होतात, जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही.

- गरम अन्न किंवा गरम पाण्यात मध मिसळून खाऊ नये. 

Web Title: How to Use Honey Diet for Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.