Lokmat Sakhi >Fitness > लाटण्याने पोळ्या लाटतोच आपण; आता व्यायामही करा, बघा 5 सोपे व्यायामप्रकार

लाटण्याने पोळ्या लाटतोच आपण; आता व्यायामही करा, बघा 5 सोपे व्यायामप्रकार

how to use Rolling the Roti by rolling as body exercise : पोळ्या करता करता लाटण्याच्या साह्याने झटपट करा असा व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 05:16 PM2022-07-18T17:16:34+5:302022-07-18T17:19:22+5:30

how to use Rolling the Roti by rolling as body exercise : पोळ्या करता करता लाटण्याच्या साह्याने झटपट करा असा व्यायाम

how to use Rolling the Roti by rolling as body exercise : By rolling we roll the Roti; Do exercise now, see 5 easy exercises | लाटण्याने पोळ्या लाटतोच आपण; आता व्यायामही करा, बघा 5 सोपे व्यायामप्रकार

लाटण्याने पोळ्या लाटतोच आपण; आता व्यायामही करा, बघा 5 सोपे व्यायामप्रकार

Highlightsदिवसभर लॅपटॉपवर बसून आपली पाठ-मान एक होते, अशावेळी स्वयंपाक करताना झटपट व्यायाम केला तर...व्यायामाला बाहेर पडायचे म्हणजे वेळेचे गणित जुळत नाही, घरच्या घरी १० मिनीटांत करा असा व्यायाम

व्यायाम करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते, रोज नियमित व्यायाम करायला हवा असे आपण नेहमी ऐकतो. पण रोजच्या धावपळीत काही केल्या व्यायामाला वेळ होत नाही हेच खरे. कितीही ठरवले तरी सकाळी उठल्यापासून घरातली कामं, सगळ्यांचे डबे, आपलं आवरणं, ऑफीस या सगळ्यामध्ये व्यायामाला कायम फाटा दिला जातो. (5 step of easy exercise) पण स्वत:साठी आपण दिवसातला अर्धा तासही वेळ काढू शकत नाही का? घरात व्यायाम करायचा म्हटला तरी रोजच्या रोज एकट्याने व्यायाम करायचा आपण कंटाळाच करतो. अशावेळी एखादे काम करता करता सहज व्यायाम झाला तर? आपला वेळही वाचेल आणि व्यायामासाठी बाहेर कुठे जावे न लागता घरच्या घरी अगदी सहज व्यायाम होईल. आता असे कोणते काम आहे जे करताना आपण सहज व्यायाम करु शकतो ते पाहूया (how to use Rolling the Roti by rolling as body exercise)...

(Image : Google)
(Image : Google)

तर पोळ्या करणे हे काम बहुतांश महिलांना आजही चुकलेले नाही. सकाळी उठल्यावर आपण पोळ्यांची कणीत भिजवून ठेवतो, भाजी चिरतो आणि इतर कामं झाल्यावर पोळ्या लाटायला घेतो. पोळ्या ज्या लाटण्याने लाटतो ते लाटणे व्यायामासाठी अतिशय उत्तम माध्यम आहे. आता लाटण्याने पोळ्या लाटण्याबरोबरच आईच्या हातचा मार खाल्लेला असू शकतो. पण लाटण्याच्या साह्याने व्यायाम कसा करायचा असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल. तर प्रसिद्ध योगा एक्सपर्ट रिटा कानाबार यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून पोळ्या करता करता सहज करता येतील असे काही व्यायामप्रकार सुचवले आहेत. यामुळे आपले स्नायूंची अतिशय चांगली हालचाल होईल आणि वजन कमी करण्यासाठीही याचा चांगला उपयोग होऊ शकतो. हे व्यायाम आपण पोळ्या लाटताना किंवा लाटण्याच्या आधी, नंतर असे कधीही करु शकतो, पाहूयात हे व्यायामप्रकार कोणते...

१. आर्मचे व्यायाम 

लाटणे दोन्ही हातात कंबरेच्या मागे धरुन कंबरेतून खाली वाकायचे. त्यानंतर लाटणे धरलेले हात मागून डोक्यावर घ्यायचे. हात जास्तीत जास्त पुढे आणायचा प्रयत्न करायचा. हे आसन करताना पायात आपल्या खांद्याइतके अंतर घ्यायचे. दिवसभर कॉम्पुटरवर काम करुन अनेकदा आपले खांदे, पाठ, हात खूप दुखतात. अशावेळी या स्नायूंना व्यायाम मिळण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. 

२. फोरआर्मचे व्यायाम 

लाटणे दोन्ही हातात धरुन हात डोक्यावर घ्यायचे. एकदा डावीकडचा हात खाली करायचा, एकदा उजवीकडचा हात खाली करायचा. लाटणे दोन्ही हाताने धरुन हा व्यायाम केल्याने नकळत दोन्ही हातांना, खांद्यांना आणि मानेच्या स्नायूंना चांगला व्यायाम होतो. यामध्ये कंबर, बरगडी आणि पोटाचे स्नायूही काही प्रमाणात मोकळे होतात. 

३. खांदे

एक हात पाठीच्या दिशेला मागे घ्यायचा. लाटणे त्या हातात धरुन दुसरा हात कानाच्या बाजुने वर करायचा आणि त्या हाताने लाटण्याचे दुसरे टोक पकडायचे. यामध्ये हात, खांदे आंना काही प्रमाणात ताण पडतो. तसेच दोन्ही हात वर खाली करत हातांची हालचाल करत राहायची. असे दोन्ही हाताने केल्यास खांद्यांना चांगला आराम मिळतो. 

४. छाती आणि कंबर 

लाटणे दोन्ही हाताने डोक्याच्या वर धरावे. पाय एकमेकांना जोडून घ्यावे आणि ताठ उभे राहावे. पूर्ण पोझिशन घेतल्यानंतर कंबरेतून एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे वळावे. यामध्या पाठ, पोट, कंबर अशा सगळ्याच अवयवांना ताण पडत असल्याने हे स्नायू मोकळे होण्यास मदत होते. 

५. हात आणि खांद्याचा व्यायाम

लाटणे दोन्ही हातात धरुन हात डोक्यावर घ्यावेत. शरीर ताठ ठेवावे आणि हात कोपरात वाकवत मानेपर्यंत आणावेत. यामध्येही शरीराच्या बऱ्याच स्नायूंना आराम मिळत असल्याने खांदे, हात, पाठ मोकळी होण्यास मदत होते. झटपट होणारे हे व्यायाम पोळ्या करता करता १० मिनीटांत होऊ शकतात. पण त्यामध्ये नियमितता ठेवल्यास त्याचा सांधेदुखी कमी होण्यास नक्कीच उपयोग होईल.  
 

Web Title: how to use Rolling the Roti by rolling as body exercise : By rolling we roll the Roti; Do exercise now, see 5 easy exercises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.