Join us  

वाढलेलं वजन आवाक्यात येत नाही-पोट आणि मांड्या थुलथुलीत? चिमूटभर हळदीचे ५ उपयोग, बघा फरक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2024 3:04 PM

How To Use Turmeric (Haldi) To Lose Weight : चिमूटभर हळद वापरुन नेमानं काही उपाय केले तर वजन आणि पोट नक्की कमी होईल

धावत्या जीवनशैलीमुळे वजन झपाट्याने वाढणे (Weight Gain) ही एक कॉमन समस्या बनली आहे. वाढतं वजन कमी करावं कसं असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. हल्ली लोकं वजन कमी करण्यासाठी काहीही करू शकतात. अनेकांना वजन कमी करण्यासाठी जिम, व्यायाम किंवा डाएट फॉलो करायला पुरेसा वेळ मिळत नाही. अशा वेळी लोकं बाजारात मिळणाऱ्या केमिकल प्रॉडक्ट्सच्या आहारी जातात (Weight Loss). पण केमिकल प्रॉडक्ट्सव्यतिरिक्त आपण हळदीचा वापर करूनही वजन कमी करू शकता. हळद प्रत्येकाच्या घरात आढळते.

भारतीय मसाल्यांमध्ये हळद मुख्य मसाला मानला जातो (Turmeric for Weight Loss). हळदीमुळे पदार्थाची चव तर वाढतेच, शिवाय आरोग्याला देखील फायदेशीर ठरते. त्यातील गुणधर्म शरीरातील चरबी जाळण्यास मदत करते. पण वजन कमी करण्यासाठी हळदीचा वापर कसा करावा?(How To Use Turmeric (Haldi) To Lose Weight).

वजन कमी करण्यासाठी हळदीचा वापर

१- सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने चयापचय बुस्ट होते. यामुळे चरबी जलद बर्न होते. यासाठी पाणी उकळत असताना त्यात एक कच्च्या हळदीचा तुकडा घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात आपण लिंबू किंवा मध देखील मिक्स करू शकता. यामुळे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत मिळेल.

२- आपण हळद आणि आलं भाजून खाऊ शकता. याशिवाय गरम पाण्यात एक इंच आलं आणि हळद घालून पाणी उकळवण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर गाळून रिकाम्या पोटी पाणी प्या.

वजन वाढले-पोट सुटले? कोमट पाण्यात चिमूटभर ४ पदार्थ घालून प्या, वजन होईल कमी

३- हळद आणि मध वजन कमी करण्यास मदत करू शकते. यासाठी पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात हळद आणि मध घालून मिक्स करा. नंतर गॅस बंद करा. पाणी गाळून नियमित सकाळी रिकाम्या पोटी प्या.

४- हळदीचे दूध आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यासाठी कपभर दुधात चिमुटभर हळद घालून रात्री झोपण्यापूर्वी दूध प्या. नियमित हळदीचे दूध प्यायल्याने प्रतिकारशक्तीही वाढेल आणि झोपेची गुणवत्ता सुधारेल.

५- हळदीमध्ये दालचिनी मिसळून प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होईल. शिवाय रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहील. रोज सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहील.

काय सांगता! फळांचा रस प्यायल्याने वाढते वजन? काय खरं काय खोटं? संशोधक सांगतात..

हळदीमधील गुणधर्म

हळदीमध्ये विटामीन सी, पोटॅशिअम, प्रोटीन, फायबर ,कॅल्शिअम, लोह,कॉपर , झिंक, थायमिन तसेच राइबोफ्लेविनचे गुणधर्ण असतात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. शिवाय पचनक्रियाही सुधारते.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स