दररोज तासनतास मैदानावर वॉकिंग करणारे अनेक जण आपण पाहतो.. काही जणं तर वॉकींगच्या (walking for weight loss) बाबतीत एवढे नियमित असतात की त्यांच्या चालण्याच्या व्यायामात एक दिवसही गॅप पडत नाही.. पण तरीही त्यांचं वजन मात्र जशाच तसंच असतं.. मग वजन कमी करण्यासाठी चालायचं की नाही, हा प्रश्न कोणाच्याही मनात येणं अगदी साहजिक आहे. म्हणूनच तर चालण्याचा व्यायाम करायचा असेल, तर हा व्यायाम आपण नेमका कशासाठी करतो आहोत, त्यामागचा आपला उद्देश काय, या गोष्टी तुमच्या तुम्हाला पक्क्या माहिती पाहिजेत. (what is power walk)
चालण्याचा व्यायाम अतिशय उत्तम आहे, हे तर आपण जाणतोच. त्यामुळेच तर तुम्ही दिवसभर कोणता दुसरा व्यायाम केला नाही, तरी चालेल पण फिट राहण्यासाठी ३० ते ४० मिनिटांचा वॉक मात्र दररोज घ्या, असं फिटनेस तज्ज्ञ सांगतात. फिटनेस टिकविण्यासाठी चालणे आणि वजन कमी करण्यासाठी चालणे हे दोन पुर्णपणे वेगळे प्रकार आहेत. तसेच या दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही कसे चालले पाहिजे, तुमची स्पीड कशी असावी, चालताना तुमच्या हालचाली कशा असाव्या, याबाबतीतही लहान मोठे बदल होत जातात... म्हणूनच जर प्रामुख्याने वेटलॉससाठी तुम्ही चालण्याचा व्यायाम करत असाल, तर तो कसा असावा, त्यासाठी पॉवर वॉक असा उपयुक्त ठरतो, हे या लेखामध्ये जाणून घेऊ.
फिटनेस टिकविण्यासाठी वॉकिंग करताना...- अगदी तरुण मंडळींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाला फिटनेस जपण्यासाठी चालले पाहिजे. आजकाल बैठे काम वाढल्याने किंवा दुचाकी, चारचाकीचा वापर वाढल्याने पायी चालणे कमी झाले आहे.त्यामुळे कमी झालेली लेग मुव्हमेंट गुडघेदुखी, पायदुखी, कंबरदुखी अशा अनेक समस्या निर्माण करते. त्यामुळेच योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात शारिरीक हालचाली होण्यासाठी चालण्याचा सल्ला दिला जातो. - फिटनेस जपण्यासाठी चालणार असाल तर तुम्हाला खूप जलद चालण्याची गरज नाही. तुम्ही एकसमान लयीत तुमचे चालणे ठेवा. चालताना नजर समोर आणि खांदे ताठ राहतील याची मात्र काळजी घ्या.- फिटनेस जपण्यासाठी चालत असाल तर चालताना एक- दोन मिनिटांचा गॅप घेतला तरी चालतो.
वेटलॉससाठी चालताय? मग असा करा पॉवर वॉक - वेटलॉससाठी चालत असाल तर मग तुम्हाला चालताना एक ठराविक स्पीड राखता येणं गरजेचं आहे. स्पीडमध्ये चालणं यालाच पॉवर वॉक म्हणतात. पण पॉवर वॉक घेताना तो कसा आणि कितीवेळ घ्यावा, हे माहिती असणं गरजेचं आहे. - पॉवरवॉक घेण्यासाठी चालायला सुरुवात केल्याकेल्या एकदम स्पीडमध्ये चालू नका. सुरुवातीला १० ते १५ मिनिटे मध्यम लय ठेवा. यानंतर हळूहळू स्पीड वाढवा आणि त्यानंतर १० मिनिटे जलद गतीने चाला. पॉवरवॉक सुरू असताना मध्ये ब्रेक घेणं टाळा.- पॉवरवॉक जास्तीतजास्त १५ मिनिटांचाच करा. त्यानंतर हळूहळू पुन्हा स्पीड कमी करत मध्यम करा. - चालण्याची लय मध्यम असताना तुम्ही हात गोलाकार फिरवणे, हाताच्या बोटांची उघडझाप करणे असे हलके- फुलके व्यायाम करू शकता.