कंबरदुखी, सांधेदुखी अशा समस्या आधी फक्त वयस्कर लोकांनाच जाणवायच्या. पण आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांननाच या समस्यांचा सामना करावा लागतो. योग्य स्थितीत न बसणं, बराचवेळ एकाच जागी बसून राहणं यामुळे या समस्या वाढल्या आहेत. जास्त वेळ बसणे, योग्य आसन न करणे यामुळे पाठदुखीची समस्या वाढत आहे. (Tailbone Pain Causes, Symptoms, Treatment)
जर तुम्हाला महिनोंमहिने पाठदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही योगासनेही तुम्हाला मदत करू शकतात. पाठदुखी कमी करण्यासाठी तुम्ही 3 योगासने केली पाहिजेत. लाइफस्टाइल कोच आणि योगा ट्रेनर सिमरन कौर यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना या योगासनांबद्दल माहिती दिली आहे. (Understanding the Causes of Tailbone Pain)
टेलबोन म्हणजेच माकड हाडात वेदना का होतात? (Tailbone pain Causes, diagnosis, and relief)
अनेक वेळा व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे माकड हाडात वेदना सुरू होतात. या वेदना व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 6, बी 12 शी संबंधित असू शकतात. म्हणूनच जीवनसत्त्वांची कमतरता पूर्ण करणे देखील खूप महत्वाचे आहे. सर्व जीवनसत्त्वे तुम्ही पुरेशा प्रमाणात सेवन केली पाहिजेत.
हाडाच्या दुखण्यामुळे, बसल्यावर, मल पास करताना, बसल्यानंतर उभे राहताना खूप वेदना होतात. दैनंदिन जीवन जगण्यासाठी हे दुखणे बरे करणे अत्यंत आवश्यक आहे. काही घरगुती उपाय करूनही या दुखण्यापासून आराम मिळतो. या घरगुती उपचारांमध्ये गरम आणि कोल्ड कॉम्प्रेस, मसाज तंत्र, नैसर्गिक तेल वापरणे आणि इतर काही तंत्रांचा समावेश आहे.
कॅमल पोज
या व्यायामात पाठ आणि कंबरेचे स्नायू ताणले जातात. असे केल्याने, तुमचे पोट ताणले जाते आणि त्याच वेळी जेव्हा तुम्ही स्वतःला सैल सोडता तेव्हा तुम्हाला आरामदायी वाटते. यामुळे पाठीच्या खालच्या भागात दुखणे कमी होते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे. हृदय आणि खांद्यासाठी देखील चांगले ठरते.
ब्रिज पोझ
सर्व प्रथम आपल्या पाठीवर झोपा. गुडघे वाकवून पाय जमिनीवर सरळ ठेवा.घोट्याला नितंबांपर्यंत ताणून घ्या. जमिनीवरून दाब देऊन पाय आणि हात वर करा. नितंब आणि छाती वरच्या दिशेने न्या. पाठीचा कणा उचला. काही सेकंदासाठी या स्थितीत राहिल्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीत या.
चक्रासन
यामुळे शरीरातील तणाव दूर होतो. कोअर, हात आणि पाय मजबूत होतात. खांदा आणि छाती ताणली जाते. पाठदुखीवर आराम मिळतो.