फिट (Fitness) राहण्यासाठी आपण बऱ्याच प्रकारचे व्यायाम करतो (Morning Walk). त्यातील एक म्हणजे वॉकिंग. चालल्याने आपले वजन तर कमी होतेच, शिवाय गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो (Mental Health). रोज मॉर्निंग वॉक करण्याचे अनेक फायदे आहेत. मोकळ्या आणि ताज्या हवेत फिरल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. सकाळी आपण ग्रुपसोबत मॉर्निंग वॉक करतो, किंवा एकटेच फेरफटका मारतो. पण दोघांपैकी फायद्याचं काय?(How Walking Can Benefit Your Mental Health).
पार्टनरसोबत फिरण्याचे फायदे
वॉकिंग करताना कोणी सोबत असेल तर, आपल्याला एनर्जेटिक वाटते. चार पाउलं जास्त चालण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. जर आपण आता सुरुवात करत असाल तर, पार्टनरसोबत असल्या कारणाने आपल्याला अस्ताव्यस्त वाटत नाही. समोरचा व्यक्ती त्याच्या अनुभवांवरून आपल्याला वॉकिंगचे फायदे आणि काही टिप्सही देऊ शकतो.
वृद्ध लोकांनी मॉर्निंग वॉक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
रोजच्या चालण्याबरोबरच सुरक्षितताही महत्त्वाची आहे. वृद्ध व्यक्तींनी नेहमी जोडीदारासोबत फिरावे. यामुळे त्यांना सुरक्षित वाटेल आणि कोणालाही न घाबरता चालता येईल.
आत्मविश्वास वाढतो
मोकळ्या हवेत वॉक केल्याने आपल्याला शारीरिकदृष्ट्या चांगले वाटते. याचा आपल्याला मानसिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. जर आपण मित्र किंवा कुटुंबाच्या कोणत्या व्यक्तीसोबत वॉक करत असाल तर, त्यांच्यासोबत आपले बंध अधिक घट्ट होते. विचारांची देवाणघेवाण होते. काही लोक व्यायामाचा कंटाळा करतात. पण सोबत कोणी असेल तर, व्यायाम करण्याचा हुरूप वाढतो.
या गोष्टी लक्षात ठेवा
पार्टनरसोबत वॉक करताना काही गोष्टींची काळजी घ्याला हवी. चालताना जास्त बोलणे टाळा. कारण यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होईल, आणि यामुळे आपल्याला थकवाही जाणवू शकतो. जास्त बोलल्याने आपले लक्ष विचलित होऊ शकते. तुम्हाला व्यायामातून मिळणारा फायदा शरीराला मिळणार नाही.
सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात 'या' पद्धतीने बदाम खाल तर मिळेल पोषण; अन्यथा कर्करोग आणि..
एकटे चालणे
तज्ज्ञांच्या मते, एकटे फिरणे अधिक फायदेशीर आहे. आपलं संपूर्ण लक्ष स्वतःकडे असते, आणि एकटे चालल्याने आपले लक्ष स्वतःच्या ग्रोथकडे असते.