Lokmat Sakhi >Fitness > हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी 'या' पद्धतीने करा वॉकिंग, आरोग्याला होतील भरपूर फायदे

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी 'या' पद्धतीने करा वॉकिंग, आरोग्याला होतील भरपूर फायदे

Fitness Tips: चालण्याचा व्यायाम दररोज केल्यामुळे फिटनेस टिकून राहण्यास तर मदत होतेच. पण आता त्यासोबतच हृदयही मजबूत करायचं असेल तर बघा वॉकिंग करण्याची योग्य पद्धत (how walking can help in improving heart health?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 15:09 IST2024-12-21T15:08:47+5:302024-12-21T15:09:36+5:30

Fitness Tips: चालण्याचा व्यायाम दररोज केल्यामुळे फिटनेस टिकून राहण्यास तर मदत होतेच. पण आता त्यासोबतच हृदयही मजबूत करायचं असेल तर बघा वॉकिंग करण्याची योग्य पद्धत (how walking can help in improving heart health?)

how walking can help in improving heart health, 5 tips for making your walking exercise beneficial for heart health | हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी 'या' पद्धतीने करा वॉकिंग, आरोग्याला होतील भरपूर फायदे

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी 'या' पद्धतीने करा वॉकिंग, आरोग्याला होतील भरपूर फायदे

Highlights चालताना दोन्ही हातांची हालचाल करा. हात वर- खाली, डावीकडे- उजवीकडे अशा पद्धतीने हलवा. असे केल्याने.....

बरेच जण चालण्याचा व्यायाम नियमितपणे करतात. त्यांच्याकडून इतर कोणता व्यायाम होत नाही. पण सकाळी किंवा संध्याकाळी घराबाहेर पडून मात्र ते आवर्जून वॉकिंगला जातात. बाहेरच्या मोकळ्या हवेत चालणं त्यांना मनापासून आवडतं. फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी नियमितपणे चालणं किती गरजेचं आहे, हे आपल्याला माहितीच आहे. पण काही जणांच्या मते चालण्यामुळे हृदयाला विशेष असा फायदा होत नाही. शिवाय हल्ली तरुण वयातच हृदयविकाराचा त्रास होण्याचे प्रमाण बरेच वाढले आहेत (how walking can help in improving heart health?). त्यामुळे काही तज्ज्ञ चालतानाच कशा पद्धतीने चालावं, जेणेकरून ते हृदयासाठीही फायदेशीर ठरू शकतं, याविषयी माहिती देत आहेत.(5 tips for making your walking exercise beneficial for heart)

 

हृदयाच्या आरोग्यासाठी चालताना कराव्या अशा ५ गोष्टी..

१. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार २०१८ साली जो अभ्यास करण्यात आला होता त्यानुसार चालताना श्वसनावर लक्ष केंद्रित करावे. अधिकाधिक दिर्घ श्वसन करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे हृदयाचाही चांगला व्यायाम होतो.

Winter Shopping: थर्मल वेअरची खरेदी करताना ३ गोष्टी तपासा, नाहीतर थर्मल घालूनही वाजेल थंडी

२. आपल्या चालण्याचा जो वेग असतो त्यात थोडा बदल करणेही हृदयासाठी फायदेशीर ठरते. म्हणजेच एखादा मिनिट खूप फास्ट वॉकिंग करावे. त्यानंतर पुढच्या एक ते दिड मिनिटासाठी पुन्हा चालण्याचा वेग कमी करा. या पद्धतीने सातत्याने वॉकिंग करावे.

 

३. नेहमी एखाद्या बागेमध्ये किंवा झाडांनी बहरलेल्या वॉकिंग ट्रॅकमध्ये जाऊन चाला. कारण तिथली हिरवळ मनाला प्रसन्नता देते. त्यामुळे शरीरातल्या स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण आपोआप कमी होते. निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या हवेत चालल्यामुळे रक्तदाब सुरळीत होण्यास मदत होते, असंही अभ्यासात सांगण्यात आलं आहे.

गार-गरम खाल्लं की दात ठणकतात? दात किडू नये म्हणून ‘हे’ ५ पदार्थ नियमित खा 

४. शरीरासोबतच हृदयाचाही फिटनेस जपायचा असेल तर ७ हजार ते १० हजार पाऊलं दररोज चालायला हवीत.

५. चालताना दोन्ही हातांची हालचाल करा. हात वर- खाली, डावीकडे- उजवीकडे अशा पद्धतीने हलवा. असे केल्याने शरीरातला रक्तपुरवठा, ऑक्सिजनचा पुरवठा अधिक वेगवान होतो आणि ते हृदयासाठी फायदेशीर ठरते. 
 

Web Title: how walking can help in improving heart health, 5 tips for making your walking exercise beneficial for heart health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.