अनेकदा आपण उद्या जिममध्ये (Gym) जाऊन व्यायाम करू या विचाराने रात्री झोपतो (Weight Loss). पण दुसऱ्या दिवशी सकाळ होताच, आळशीपणा करतो (Fitness). व्यायाम करण्यास टाळाटाळ करतो (Morning Walk). काही दिवसांमध्ये हिवाळा सुरु होईल. हिवाळ्यात आपण सकाळी उठून वॉकिंग किंवा व्यायाम करण्यास टाळतो. ज्यामुळे शरीर हळूहळू सुटत जाते, आणि वजन वाढतं.
वजन वाढलं की शरीर गंभीर आजारांचं घर बनतं. त्यामुळे वेळेत वजन कमी करणं गरजेचं आहे. वेट लॉससाठी आपण सकाळी वॉकिंगला जातो. पण किती आणि कोणत्या वेळेत चालावं? हे अनेकांना ठाऊक नसतं. वॉकिंग करण्याचे नेमके फायदे किती? वॉकिंग करताना नेमके किती पावलं? चालावं? गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासाठी चालणं किती गरजेचं आहे? पाहा(How Walking Can Help You Lose Weight and Belly Fat).
दिवसभरात किती चालावं?
दररोज किमान १० हजार पावलं चालावं. दिवसभरात ३० ते ४० मिनिटे चालल्याने आरोग्याला बराच फायदा मिळतो. नियमित वॉकिंग केल्याने आपल्याला हलके वाटू शकते. शिवाय दिवसाची सुरुवात वॉकिंगने केल्याने दिवसभर आपल्याला एनर्जेटिक वाटेल.
नोकरी करणाऱ्या आईला छळतो गिल्ट, इंद्रा नुयी सांगतात मुलं लहान असतील तर ‘एवढं’ करा..
पायऱ्यांचा वापर करा
लिफ्टचा वापर न करता, पाऱ्यांचा वापर करा. शिवाय रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करा. वॉकिंग करताना आपल्याला कंटाळा किंवा पायही दुखू शकतात. पण हळूहळू याची सवय होईल. या सवयीमुळे गंभीर आजारांचा धोकाही कमी होईल.
चालण्याचे शरीराला होणारे फायदे
- वॉकिंग करणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात.
- चालणे चयापचय मजबूत करते ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो.
- सकाळच्या ताज्या हवेमुळे मन प्रसन्न राहते. ताण, चिंता दूर राहते. शारीरिक हालचाल आणि सूर्यप्रकाशच्या कॉम्बिनेशनमुळे एंडोर्फिनचे प्रकाशन वाढते. यामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते.
- रोज चालण्याने शरीराला चांगला ऑक्सिजन मिळतो. ऑक्सिजनच्या चांगल्या प्रवाहामुळे फुफ्फुसे निरोगी होतात.
बार्बी डॉल आता झाली भारतीय, दिवाळी साजरी करणारी ही भारतीय बार्बी पाहिली का?
- दररोज चालण्याने पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे पोटाचे विकार दूर राहतात.
- पहाटेच्या वेळी नैसर्गिक प्रकाश घेतल्याने सर्काडियन रिदम कंट्रोल करण्यास मदत मिळते. ज्यामुळे अपुऱ्या झोपेची समस्या सुटते.