Wall Sits Exercise: ऑफिसमधील कामाचा वाढता ताण, वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांचं वाढतं ओझं, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे भरपूर लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. एकदा का वजन वाढलं तर ते कमी करणं काही खायचं काम नाही. वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. वेगवेगळ्या एक्सरसाईज कराव्या लागतात. अशात आम्ही सुद्धा तुम्हाला फिट राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी एक खास आणि सोपी एक्सरसाईज सांगणार आहोत. ज्या लोकांना जिमला जायला वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी ही एक्सरसाईज परफेक्ट आहे. वॉल सिट्स असं या एक्सरसाईजचं नाव आहे.
एक्सपर्ट सांगतात की, ही एक सगळ्यात सोपी एक्सरसाईज आहे. यासाठी तुम्हाला फक्त भींतीची मदत घ्यावी लागेल. या एक्सरसाईजनं पायांचे स्नायू मजबूत होतात, पोट कमी होतं आणि स्टॅमिना वाढतो. ही एक्सरसाईज रोज ५ मिनिटं केली तरी तुम्हाला भरपूर फायदे मिळतात. या एक्सरसाईजनं काय काय फायदे मिळतात ते जाणून घेऊ.
पाय आणि मांड्या होतील मजबूत
जर्नल ऑफ फिजिकल थेरपी सायन्सनुसार, जर तुम्हाला तुमच्या पायांच्या मसल्स मजबूत करायच्या असतील तर वॉल सिट्स तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरेल. यानं मांड्याही मजबूत होतील आणि कंबरेवरील चरबी सुद्धा कमी होईल.
बॅलन्स आणि स्ट्रेंथ वाढते
वॉल सिट्स एक्सरसाईज करून तुमचे स्नायू मजबूत होतात. पोट आणि लोअर बॅक स्ट्रॉंग होतात. या पोजिशनमध्ये शरीर स्टेबल ठेवण्यासाठी मसल्स सतत अॅक्टिव राहतात, ज्यामुळे बॉडी बॅलन्स आणि स्टेबिलिटी चांगली होते. ज्यामुळे शरीराला सुद्धा अनेक फायदे मिळतात.
गुडघे आणि जॉइंट्ससाठी फायदेशीर
जर तुम्ही जास्त हेवी एक्सरसाईज करू शकत नसाल आणि तुम्हाला गुडघे आणि जॉइंट्स चांगले ठेवायचे असतील तर तुम्ही ही एक्सरसाईज करू शकता. ही एक कमी शक्ती लागणारी एक्सरसाईज असून यामुळे गुडघे आणि जॉइंट्सवर जास्त दबाव पडत नाही. यामुळे जॉइंट्समधील लवचिकता वाढते आणि इजा होण्याचा धोकाही कमी होतो. बॉडी पोश्चरमध्ये सुधारणा होते.
कॅलरी बर्न आणि फॅट लॉस
जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर वॉल सिट्स फॅट बर्न करण्यास मदत करते. रोज ५ मिनिटं ही एक्सरसाईज केली तर भरपूर कॅलरी बर्न होतात. यासोबतच हाय इन्टेन्सिटी एक्सरसाईज केली गेली तर मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन वेगानं कमी करण्यास मदत मिळेल.
मानसिक आरोग्य सुधारतं
ही एक्सरसाईज केल्यानं शरीराला तर अनेक फायदे मिळतातच, सोबतच मानसिक आरोग्यही चांगलं होतं. जेव्हा तुम्ही या पोजिशनमध्ये असता तेव्हा लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता आणि कंट्रोल करण्याची क्षमता वाढते. हळूहळू स्टॅमिना वाढतो.