ऋतिक रोशनचे (Hrithik Roshan) ट्रेनर क्रिस गेथिन (Kris Gethin) अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये दिसून आले. ज्यात त्यांनी फॅट लॉस (Fat Loss) करण्यासाठी एक चांगला आणि परिणामकारक उपाय सांगितला. क्रिस गेथिन असे ट्रेनर आहेत ज्यांच्यावर मोठमोठे बॉलिवूड स्टार्स फिदा आहेत. आजकाल प्रत्येकजण झटपट वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतो.
वेगाने वजन कमी करण्यासाठी त्यांनी एक फॉर्म्यूला सांगितला आहे. ज्यामुळे कमीत कमी वेळात जास्त चांगला परिणाम दिसून येईल. रेजिस्टंस ट्रेनिंग एक असा व्यायाम प्रकार आहे ज्याला ऋतिकच्या ट्रेनरनं सगळ्यात उत्तम असल्याचे सांगितले आहे. ( Hrithik Roshan Fitness Trainer Kris Gethin Reveals This I Exercise Can Do The Faster Fat Loss)
वेगाने फॅट बर्न करण्यासाठी रेजिस्टंस ट्रेनिंग
रेजिस्टेंट ट्रेनिंग कॅलरी बर्न करण्यास आणि मांसपेशी मजबूत करण्यास मजबूत करते. जे निरोगी शरीरात फॅटचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी फार महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त मांसपेशी मजबूत करण्यासही मदत होते. ट्रेनर सुचवतात की रोजच्या जीवनात रेजिस्टेंस ट्रेनिंगचा समावेश केला तर शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. यामुळे बोन डेन्सिटी चांगली राहते आणि फिटनेस मेंटेन ठेवण्यास मदत होते.
फॅट लॉससाठी झोप महत्वाची
ऋतिक रोशनच्या ट्रेनरने या व्हिडिओमध्ये फॅट लॉससाठी एक चांगली झोप घेण्याचे महत्व सांगितले आहे. योग्य प्रमाणात झोप घेतल्याने मेंदू चांगला राहण्यास मदत होते. ज्यामुळे स्वत:ला मोटिव्हेट करणं सोपं होतं. याशिवाय झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात कोर्टिसोल नावाच्या हॉर्मोनचे निर्माण वाढते आणि फॅट बर्न होण्यास मदत होते मांसपेशी तयार होण्याच्या क्रियेत बाधा येते.
कंबर-पाठ खूपच दुखते? कॅल्शियमचा साठा आहेत ६ पदार्थ, रोज खा-२०६ हाडांना येईल ताकद
व्यायाम शक्य नसेल तर ५० वेळा उठाबशा काढा
क्रिस गेथिन सांगतात वाढत्या वयात मांसपेशी कमकुवत होऊ लागतात. जेव्हा तुम्ही दिवसभरात ५० वेळा उशा बशा काढाल तेव्हा तुमची रेजिस्टेंट ट्रेनिंग होईल. जपानमधील ओकिनावामध्ये एका ठिकाणाला ब्लू जोन असंही म्हणतात. ज्या ठिकाणचे लोक इतर ठिकाणच्या लोकांपेक्षा जास्त जीवन जगतात. कारण ते दिवसभरात ५० पेक्षा जास्त वेळा जमीनिवर उठ-बस करतात.
१०० वर्ष आयुष्य हवंय? निरोगी दीर्घायुष्यासाठी सद्गुरू सांगतात खास उपाय; भरपूर आयुष्य वाढेल
वजन कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लॅनिंग करा
शरीराची चरबी कमी करण्यासाठी सगळ्यात उत्तम वर्कआऊट प्लान स्टेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ दोघांचा समावेश करा. स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी तुम्ही बारबेलचा व्यायाम करू शकता. बारबेल एका खांदयावर ठेवा मागून व्यवस्थित पकडा त्यानंतर खुर्चीवर बसून राहा. बारबेल आपल्या खांद्याच्या समोर पकडा आणि बसण्याच्या स्थितीत या. बारबेल व्यवस्थित पकडून सरळ उभं राहाल नंतर वाकून उभं राहा. जमीनिवर झोपून पाय मोडून कुल्ह्यांना वर उचला.
बारबेल सरळ आपल्या डोक्याच्या वर उचला. पाठीवर टेकून राहिल्यानंतर छाती वर उचला आणि पुन्हा खाली आणा. बारबेल पकडून पुढच्या बाजूनं थोडं वाका नंतर सरळ उभं राहा. बारबेल नसेल तर हा उपाय करा. आपल्या शरीराच्या वजनाबरोबर स्वॅक्ट करा. जमिनीवर डम्बेल्स किंवा केटलबेल उचलून सरळ उभं राहा, जमीनीवर पोटावर झोपून पुश-अप्स मारा, कोपऱ्यांच्या साहाय्याने शरीर सरळ ठेवा, सरळ पुअअप्स करा.