Join us  

'तब्येतीच्या अनेक समस्यांनी मलाही छळलेय पण तरी मी...", भाग्यश्री सांगतेय पाठदुखी छळते तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2022 8:10 AM

Fitness Tips By Bhagyashree: दुखतं, त्रास होतो म्हणून व्यायाम करणं सोडू नका. उलट शरीराला व्यायामाची सवय लावा, शिस्त लावा... असा खास सल्ला दिला आहे अभिनेत्री भाग्यश्रीने.

ठळक मुद्देस्वत:ची गोष्ट सांगत भाग्यश्रीने तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा व्यायामासाठी प्रोत्साहित केलं आहे.

पन्नाशी ओलांडूनही अभिनेत्री भाग्यश्रीमधला (Actress Bhagyashree) ग्रेस, तिचा फिटनेस जराही कमी झालेला नाही. याचं कारण म्हणजे ती नियमितपणे करत असलेला व्यायाम आणि व्यायामाबाबत तिने स्वत:ला लावून घेतलेली शिस्त. फिटनेसविषयी (fitness tips) आपल्या चाहत्यांनाही प्रेरणा देण्याचा तिचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळेच व्यायामाचे वेगवेगळे व्हिडिओ (viral video) ती नेहमीच सोशल मिडियावर शेअर करत असते. आता नुकताच तिने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला असून शरीराला व्यायामाची शिस्त असणं किती गरजेचं आहे, हे तर सांगितलं आहेच. पण त्यासोबतच पाठदुखीचा त्रास कमी करण्यासाठी (how to reduce back pain) कोणता व्यायाम करावा, हे देखील सांगितलं आहे. 

 

या व्हिडिओमध्ये भाग्यश्री म्हणतेय की माझे वर्कआऊट व्हिडिओ पाहून तुम्हाला मी खूप फिट आहे, असं वाटत असेल. पण मुळात तसं नाहीये. मला खांदेदुखी, पाठदुखी, हाताचं दुखणं असे अनेक त्रास आहेत.

सासूबाईंसोबत शेतात कांदे लावतेय फॉरिनची सुनबाई.. शेतात काम करणाऱ्या सासू- सुनेचा व्हायरल व्हिडिओ

पण असे त्रास असले तरी 'गिव्ह अप' करायचं नाही, हा माझा मंत्र आहे. त्यामुळेच मी आतापर्यंत माझा फिटनेस टिकवून आहे. काही वर्षांपुर्वी माझ्या उजव्या हाताला  दुखापत झाली होती. त्यामुळे मला तो हात अजिबात हलवता यायचा नाही. त्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. 

 

पण नियमितपणे व्यायाम केल्याने, स्वत:ला शिस्त लावल्याने शरीर आपोआप रिकव्हरी करतं, यावर माझा विश्वास आहे. त्यानुसार मी खूप नियमितपणे व्यायाम सुरू केले आणि बघा काही महिन्यांतच माझा हात पुर्ववत झाला.

हिवाळ्यात केस कोरडे झाल्याने फाटे फुटण्याचं प्रमाण वाढतं.. ५ उपाय, स्प्लिट हेअरचा त्रास कमी

हे खरोखरच एक आश्चर्य होतं. अशी स्वत:ची गोष्ट सांगत भाग्यश्रीने तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा व्यायामासाठी प्रोत्साहित केलं आहे. त्यासोबतच trx बेल्टच्या मदतीने पाठदुखी कमी करण्यासाठी व्यायाम कसा करावा, याचं प्रात्यक्षिकही दाखवलं.  

 

टॅग्स :फिटनेस टिप्सभाग्यश्रीव्यायाम