Lokmat Sakhi >Fitness > दुपारी खूप जांभाया येतात, ग्लानी येते? १ मिनिटाचा सोपा उपाय, झोप उडेल - वाटेल फ्रेश

दुपारी खूप जांभाया येतात, ग्लानी येते? १ मिनिटाचा सोपा उपाय, झोप उडेल - वाटेल फ्रेश

If You Are Feeling Sleepy while Working 1 Easy Solution : या उपायामुळे आपला आळस दूर होईल आणि मेंदूलाही थोडा व्यायाम होण्यास मदत होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2023 12:50 PM2023-04-11T12:50:34+5:302023-04-11T13:27:26+5:30

If You Are Feeling Sleepy while Working 1 Easy Solution : या उपायामुळे आपला आळस दूर होईल आणि मेंदूलाही थोडा व्यायाम होण्यास मदत होईल.

If You Are Feeling Sleepy while Working 1 Easy Solution : Too sleepy while working? 1 minute easy solution, sleep will disappear, brain will be fine | दुपारी खूप जांभाया येतात, ग्लानी येते? १ मिनिटाचा सोपा उपाय, झोप उडेल - वाटेल फ्रेश

दुपारी खूप जांभाया येतात, ग्लानी येते? १ मिनिटाचा सोपा उपाय, झोप उडेल - वाटेल फ्रेश

आपण सकाळी झोपेतून उठतो आणि कामाला लागतो. मग आवरुन नाश्ता करुन ऑफीसला पोहोचतो आणि कामाला सुरुवात करतो. थोडे काम होते न होते तोच आपल्याला अचानक खूप झोप यायला लागते. समोर कामाचा डोंगर असताना आपल्याला मात्र पेंगायला होत असतं. बरेचदा आपली झोप पूर्ण झालेली नसते त्यामुळे असं होतं. तर काही वेळा झोप झालेली असली तरी असं होतं. उन्हाळ्याच्या दिवसांत तर असा थकवा आणि आळस नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात येतो. पण कामाच्या डेडलाईन्स, प्रोजेक्टस, टार्गेट यांचे आकडे डोळ्यासमोर फिरत असल्याने आपल्याला अशी पेंग येऊ चालणार नसते (If You Are Feeling Sleepy while Working 1 Easy Solution). 

मग ही झोप घालवण्यासाठी आपण बरेचदा काही ना काही उपाय करतो. यामध्ये चहा किंवा कॉफी पिणे, काहीतरी खाणे, एखादी चक्कर मारुन येणे, डोळ्यावर आणि चेहऱ्यावर पाणी मारणे अशा उपायांचा समावेश असतो. मात्र आज आपण असा एक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला ऑफीसचे काम करताना किंवा एरवीही खूप झोप आली असेल तर ती जायला मदत होईल. इतकेच नाही या उपायामुळे आपला आळस दूर होईल आणि मेंदूलाही थोडा व्यायाम होण्यास मदत होईल. योगा अभ्यासक जूही कपूर यांनी हा उपाय सांगितला असून नियमितपणे तो केल्यास मेंदूला ऊर्जा मिळण्यासही चांगली मदत होते.

(Image : Google)
(Image : Google)

काय आहे नेमका उपाय? 

उजव्या हाताचा अंगठा आणि पहिलं बोट एकमेकांना जोडा. त्यानंतर मधलं बोट आणि अंगठा असं करत करंगळी आणि अंगठ्यापर्यंत करा. त्याचवेळी डाव्या हाताने पहिल्यांदा करंगळी आणि अंगठा एकमेकांना जोडून शेवटी पहिलं बोट आणि अंगठा एकमेकांना जोडला जायला हवा. म्हणजेच दोन्ही हाताने क्रिया सारखीच असली तरी बोटांचा क्रम वेगळा असायला हवा. हा प्रयोग किमान १० वेळा केल्यास चांगला रिझल्ट मिळण्यास मदत होते. 

फायदे 

१. फोकस  होण्यास मदत होते. 

२. एकाग्रता सुधारण्यास मदत होते

३. उत्तेजनांना प्रतिसाद सुधारण्यासाठी उत्तम व्यायाम

 

४. परीक्षेच्या तयारीत मदत होते

५. नवीन न्यूरल मार्ग तयार करण्यासाठी फायदेशीर 

६. यामुळे कोणताही त्रास होत नाही, त्यामुळे कोणीही हा व्यायाम करु शकते

७. कंटाळा दूर होण्यास मदत होऊन तरतरी येते

Web Title: If You Are Feeling Sleepy while Working 1 Easy Solution : Too sleepy while working? 1 minute easy solution, sleep will disappear, brain will be fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.